Gas Cylinder Dainik Gomantak
गोवा

हाच का ‘विकास’? आठ महिन्‍यांत गॅस सिलिंडरच्या दरात 190 रुपयांची वाढ

महिनाभरात दुसऱ्यांदा गॅस सिलिंडर दरवाढीचा भडका

दैनिक गोमन्तक

पणजी: घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinder) दरात पुन्हा एकदा वाढ झाली असून आता आणखी सिलिंडरच्या दरात तब्बल 25 रुपयांनी वाढ झाली. महिनाभरातील ही दुसरी दरवाढ आहे. त्यामुळे गोव्यात (Goa) आता गॅस सिलिंडरचे दर 898 .50 रुपये झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केल्‍यानंतर लगेच पुन्हा वाढ केल्‍याने विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांनीही सोशल मीडियावर सिलिंडरच्या दरवाढीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गणेश चतुर्थी काही दिवसांवर आली असताना व कोरोना महामारीच्या संकटामुळे लोकांची आर्थिक स्थिती खालावली असतानादेखील सिलिंडर दरवाढीमुळे विरोधकांसोबत सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेही नाराज झालेले आहेत. मे 2020 पासून एलपीजी गॅस सिलिंडरवरील अनुदान केंद्र सरकारने बंद केले आहे.

आठ महिन्‍यांत 190 रु. ची वाढ

  1. जानेवारी 2021 पासून आत्तापर्यंत सिलिंडरच्या दरात 190 रुपये वाढ झाली.

  2. राज्यात हिंदुस्थान पेट्रोलियम (एचपी), भारत गॅस, इंडियन ऑयल, इंडेन या कंपन्‍यांचे सिलिंडर उपलब्ध.

  3. सर्वांत जास्त एचपी सिलिंडरच्या ग्राहकांची संख्या साडेचार लाख आहे.

  4. राज्यात एकूण साडेसात लाख गॅस सिलिंडर ग्राहक.

  5. सणासुदीचे दिवस असताना व जीवनावश्‍‍यक वस्तूंचे दर या अगोदरच वाढलेले असताना आता सिलिंडरचे दरही वाढल्याने गृहिणींना त्रास होणार.

LPG cylinders Price

‘विकास’ हाच का?

काँग्रेसच्‍या प्रियांका गांधी म्‍हणाल्‍या, ‘पंतप्रधान, तुमच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये विकासाचे दोनच प्रकार आहेत. एक म्हणजे अब्जाधीश मित्रांच्या संपत्तीत भर पडणे आणि दुसरे म्हणजे आवश्‍‍यक वस्‍तूंच्‍या किमती वाढवणे.

पेट्रोल -डिझेलच्या दरात घट

दरम्यान, अनेक दिवस अपरिवर्तित राहिल्यानंतर आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 13-15 पैशांची कपात करण्यात आली आहे. दिल्लीत पेट्रोलची प्रतिलिटर किंमत आता 101.34 रुपये आणि मुंबईत 107.39 रुपये प्रतिलिटर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT