Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

सुदिन ढवळीकरांना कोणती ‘खाती’ मिळणार?

रवी नाईक, गावडे समर्थकांचे लक्ष: वजनदार खात्याची फोंड्याला प्रतीक्षा

दैनिक गोमन्तक

मिलिंद म्हाडगुत

फोंडा: भाजपच्या 80 टक्के आमदारांचा विरोध असूनही सुदिन ढवळीकरांना मंत्रिपद मिळालेच. पण यातूनच अनेक जर तरची समीकरणेही जन्माला येऊ लागली आहेत. ढवळीकरांना कोणती ‘खाती’ मिळणार याकडे फोंडा तालुक्यातील लोकांचे लक्ष लागले आहे. फोंड्याला जरी तीन मंत्रिपदे दिली असली तरी त्यांना वजनदार खात्यांपासून वंचित ठेवले आहे. यामुळेच सुदिन यांच्या पदरात काय पडते, याकडे फोंडा तालुक्याचे व खास करून कृषिमंत्री रवी नाईक व कला, संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांचे कार्यकर्ते लक्ष ठेवून आहेत.

सध्या राहिलेल्या खात्यांपैकी वीज, शिक्षण व खाण ही तीनच वजनदार खाती राहिली असून त्यापैकी शिक्षण खाते हे मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवणार असल्यामुळे ते नव्याने होणाऱ्या खातेवाटपात कोणत्याही मंत्र्याला मिळणे शक्य नसल्याचे दिसते. उर्वरित दोन खात्यांपैकी सांगे मतदारसंघ खाणपट्ट्यात येत असल्यामुळे खाण खाते सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांच्याकडे जाऊ शकते. राहता राहिले ते वीजखाते. आता हे खाते सुदिन यांना मिळू नये म्हणून सध्या दबाव गट तयार होऊ लागला आहे.

वास्तविक यापूर्वी सुदिन ढवळीकर यांना सार्वजनिक बांधकाम खाते तसेच वाहतूक खाते मिळत असे. पण आता हे खाते कुडचडचे आमदार नीलेश काब्राल यांच्याकडे असल्यामुळे ते ढवळीकर यांना मिळण्याची शक्यता वाटत नाही. तरीही खातेवाटपात फेरबदल करून ते सुदिन यांना मिळू शकते, असाही एक मतप्रवाह सध्या चर्चेत आहे.

भाजपमध्ये जरी सुदिन विरोधी गट असला तरी त्यांनी आपला दबाव केंद्रीय नेते देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांच्या मार्फत तयार केल्याचे समजते. त्यांच्यामुळेच प्रखर विरोध असूनही सुदिन ढवळीकरांना मंत्रिपद मिळू शकले. आता पुन्हा ते दबाव बनवून कमीतकमी वीज खाते तरी पदरात पाडून घेतात, हे बघावे लागेल.

एकंदरीत सुदिन ढवळीकर यांना मंत्रिपद दिल्यानंतर फोंडा तालुक्यात चर्चेला उधाण आले असून त्यांचे मंत्रिपद भविष्यात फोंडा तालुक्यातील भाजपकरिता धोकादायक ठरू शकते, असा सूरही भाजपच्या गोटातून आळवला जात आहे.

फोंडा तालुक्यात संघर्षाची चिन्हे !

रवी नाईक यांच्यासारख्या मोठा जनाधार असलेल्या बहूजन समाजाच्या तसेच मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या नेत्याची कृषीखाते, हस्तकला व नागरीपुरवठा सारख्या खात्यांवर बोळवण केली गेली, हे फोंड्यातील बऱ्याच लोकांना पटलेले नाही. सुदिन यांना मंत्रिपद दिल्यामुळे फोंडा तालुक्यात संघर्ष निर्माण होऊ शकतो, अशी शक्यताही बऱ्याच भाजप कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

"आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT