सोनसोडो कचरा विल्हेवाट अहवालांमध्ये विसंगती

खंडपीठाने मागितले सरकारकडे स्पष्टीकरण
Goa Bench Of Bombay High Court
Goa Bench Of Bombay High CourtDainik Gomantak

पणजी: सोनसोडो येथील जुन्या कचरा विल्हेवाटीसंदर्भात सादर केलेल्या अहवालात विसंगती दिसून आल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सरकारला प्रश्‍न करून त्याचे स्पष्टीकरण करण्याचे निर्देश देत ही सुनावणी पुढील मंगळवारी 19 एप्रिलला ठेवली आहे.

सोनसोडो कचरा विल्हेवाटसंदर्भातच्या प्रकरणावर उच्च न्यायालय लक्ष ठेवून आहे. गोवा फाऊंडेशनने सोनसोडो येथील जुन्या कचरा विल्हेवाटीसंदर्भात सरकारकडून चालढकलणा सुरू असल्यासंदर्भातची जनहित याचिका सादर केली आहे. ती आज सुनावणीसाठी आली होती. सरकारने कचरा विल्हेवाटीसंदर्भात यापूर्वी सादर केलेल्या अहवालात 65 टक्के कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती दिली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com