What is hidden in postmortem report Bharti Samant murder case Dainik Gomantak
गोवा

भारती सामंत खून प्रकरण: पोस्‍टमॉर्टम रिपोर्टमध्‍ये दडलेय काय?

वैद्यकीय अहवाल पोलिसांनी ठेवला राखून : होलसेल खरेदीची रक्कम गेली कुठे?

दैनिक गोमन्तक

सांगे : वरकटो - सांगे येथील भारती प्रदीप सामंत यांच्या संशयास्‍पद मृत्युमुळे निर्माण होणारे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले आहेत. त्‍यांच्‍या मृतदेहाचा वैद्यकीय अहवाल आला, तरी स्थानिक पोलिस अहवाल उघड करण्‍यास तयार नाहीत. त्‍यामुळे मृत्‍यूबाबतचे गूढ कायम राहिले आहे. जनतेच्या मनात आणि कुटुंबियांच्या मनात भारती यांच्‍या अकाली मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय गडद झाला आहे. भारती यांचा भाऊ गणबा राऊत देसाई यांनीही तशीच शंका व्यक्त केली आहे.

पतीच्या निधनानंतर किराणा माल विक्रीचे दुकान भारती यांनी मोठ्या धाडसाने सुरू केले होते. वरकटो परिसरातील लोकांच्या म्हणण्यानुसार दुकानात सर्व प्रकारच्‍या जीवनावश्‍‍यक वस्‍तू विक्रीसाठी उपलब्‍ध असल्‍याने ग्राहक वर्ग मोठा लाभला होता. दर आठवड्याला होलसेल साहित्‍य विक्री करण्यासाठी घेऊन येणाऱ्या होलसेल विक्रेत्‍याकडून भारती सामंत या दर

मंगळवारी रोख साठ हजार रुपयांचे साहित्‍य खरेदी करीत होत्‍या, अशी माहिती मिळाली आहे. मृत्यूसमयी ती रक्कम त्‍यांच्‍या घरात असणे आवश्यक आहे. मात्र, ती रक्कम नसल्यास ती गायब कशी झाली? याचे उत्तर पोलिसांनी शोधून काढणे आवश्यक आहे.

अहवाल गुलदस्त्यात?

सांगे पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर उत्तरीय तपासणी करण्यासाठी हॉस्पिसियोत पाठवून दिल्यानंतर जो अहवाल यायला हवा होता, त्याची सविस्तर माहिती सायंकाळपर्यंत सांगे पोलिसांकडून दिली नाही. संपर्क साधला असता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेण्याची सूचना केली. अहवाल उघड केला नसल्‍यामुळे या प्रकरणी ग्रामस्‍थ संशयाने पाहत आहेत.

सखोल चौकशी व्‍हावी : मेशू डिकॉस्‍ता

त्‍यांच्‍या घरात पैशांसाठी यापूर्वी दोनवेळा चोरीचा प्रयत्न झाला होता, याची माहिती त्‍यांच्‍या शेजाऱ्यांनी दिली होती. आताही तसाच प्रयत्न झाला असावा आणि झटापट होऊन त्‍यांचा रक्तदाब वाढून मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सांगेचे नगरसेवक मेशू डिकॉस्ता म्हणाले की, अशा घटना घडल्यानंतर नागरिकांत भीतीचे सावट निर्माण होत असते. यापूर्वी जर भारती यांच्या घरात चोरीचा प्रयत्न झाला असेल, तर यावेळीही तशीच घटना घडून मृत्यू होण्याची भीती प्रत्येक नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे. त्‍यामुळे सांगे पोलिसांनी या घटनेच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Renuka Yellamma History: वीरशैव संप्रदायात धार्मिक उठाव झाला, सावदत्ती वैष्णव राजांच्या अधिपत्याखाली आली; यल्लम्माशी निगडित प्रथा

Betoda: बेतोड्यात आयआयटीला विरोध, सरपंचांना धरले धारेवर; ग्रामसभेत ठराव मंजूर

IND VS AUS: रोहित, विराट की आणखी कोणी? कॅप्टन शुभमन गिलनं सांगितलं पराभवाचं खरं कारण, म्हणाला...

Porascade Junction Accident: पोरस्कडे जंक्शनाकडेन भिरांकूळ अपघात

Crime News: त्रिकोणी प्रेमाचा रक्तरंजित शेवट: गर्भवती महिलेची चाकूने वार करून हत्या, खुनी आधीचा लिव्ह-इन पार्टनर, नंतर पतीने खुनीचा काढला काटा

SCROLL FOR NEXT