Colvale Jail Goa
Colvale Jail Goa  Dainik Gomantak
गोवा

Colvale Jail : कोलवाळ कारागृहात नेमके चालले आहे तरी काय?

दैनिक गोमन्तक डिजिटल

Colvale Jail : गेल्या कित्येक वर्षांपासून कडक सुरक्षा व्यवस्था असून कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात मोबाईल्स, ड्रग्स व इतर साहित्य कैद्यांपर्यंत पोहचत असल्याने तुरुंगरक्षकांसह तेथे असलेल्या सुरक्षा पोलिसांची झोप उडाली आहे. हे कोडे सुटण्याऐवजी दिवसेंदिवस अधिक कठीण होत चालले हे.

या कारागृहाच्या प्रमुखपदी आयएएस तसेच आयपीएस अधिकाऱ्यांची नेमणूक होऊनही त्याचा छडा लावण्यात यश आलेले नाही.

कारागृहातील कर्मचाऱ्यांचेच या कैद्यांशी साटेलोटे असल्याने सर्व काही अनेक वर्षे चिडीचूप सुरू आहे. कारागृहात वाढदिवस व ओल्या पार्ट्या तसेच मोबाईलचा सर्रास वापर होत असूनही तुरुंग कर्मचाऱ्यांकडून कोणतीच कारवाई केली जात नाही हे दुर्दैव आहे.

प्रत्येकवेळी जेव्हा वरिष्ठ अधिकारी कारागृहात छापा टाकतात तेव्हा कैद्यांच्या खोल्यांमध्ये मोबाईल्स किंवा ड्रग्ज मिळणे आता नवे नाही मात्र त्यांना हे आणून देतो कोण याचे उत्तर मात्र तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे असूनही ते उघड करत नाहीत.

सर्वांचीच यामध्ये मिलिभगत असून कैद्यांकडून त्यांना या वस्तू पुरवण्यासाठी दोन ते तीन पटीने पैसे मिळतात. कारागृहातील सुरक्षारक्षक व कैदी यांच्यातील संबंध जवळचे झाले असल्यानेच हे प्रकार वारंवार घडत आहेत.

या कारागृहात असलेल्या कँटीनसाठी अधुनमधून साहित्याचा पुरवठा केला जातो तसेच पाणीपुरवठ्याचे टँकर आतमध्ये जात असतात. या वाहनांची वरवर तपासणी केली जाते मात्र त्यातूनच अनेकदा हे मोबाईल्स तसेच ड्रग्ज आतमध्ये नेले जातात.

साहित्याचे स्कॅनिंग करण्यासाठी प्रवेशद्वारावर बॅगर स्कॅनर नाही. त्यामुळे या साहित्यांमधून मोबाईल्स किंवा ड्रग्जची तस्करी केली जाते का याचा ठावठिकाणा लागत नाही.

कोलवाळ कारागृह हे कैद्यांचे सुधारगृह राहिलेले नाही तर तेथे गुंडागृह बनले आहे. हे कारागृह फक्त नावापुरते असून कोठडीत असूनही काही कैदी कारागृहाबाहेरच्या जगताशी संपर्क साधून कारवाया सुरू ठेवत आहेत.

जॉर्ज यांच्या कालावधीत शिस्त

पोलिस उपमहानिरीक्षक बॉस्को जॉर्ज यांना तुरुंग महानिरीक्षकपदाचा ताबा दिल्यापासून कारागृह कर्मचाऱ्यांत शिस्त आली होती त्याचबरोबर सुरक्षा यंत्रणाही सक्रीय झाली होती.

बॉस्को जॉर्ज यांनी आपल्या छोट्याशा काळात येथील सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी तसेच मोबाईल्स व ड्रग्ज तुरुंगात पोहचवण्यापासून रोख लावण्यासाठी बॅगेज स्कॅनरचा प्रस्ताव गृह खात्याकडे पाठवला होता. मात्र त्याचे काहीच पुढे झाले नाही.

अनेक पळवाटा....

कोलवाळ येथील कारागृहात मोबाईल्स व ड्रग्ज आतमध्ये पोहचण्यासाठी अनेक पळवाटा आहेत. मुख्य प्रवेशद्वारापासून ते आतमध्ये कैद्यांच्या खोल्यापर्यंत जाण्यासाठी तीन ठिकाणी पोलिस तपासणी होते. कैद्यांची कसून तपासणी होते. मात्र तरीही चकमा देऊन ते मोबाईल सिमकार्ड आतमध्ये नेण्यास यशस्वी होत आहे. या प्रवेशद्वारावर मनुष्याचे स्कॅनिंग करणारे यंत्र नाही त्यामुळे ही तपासणी मेटल डिटेक्टरनेच होत असते. त्यामुळे ती पूर्णपणे होत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT