'मी तुझी सावली सारखी सोबत करेन' अशी म्हण आपण नाते किती घट्ट आणि अतूट आहे हे सांगण्यासाठी वापरतो. पण, विज्ञानात असाही एक दिवस येतो ज्यावेळी सावली देखील आपली साथ सोडते. भरदुपारी सावली आपल्या जवळून गायब होते याला विज्ञानाच्या भाषेत , 'शून्य सावली दिवस' (Zero Shadow Day) म्हणतात.
गोव्यात 1 आणि 2 मे या दिवशी 'शून्य सावली दिवस' अनुभवता येणार आहे.
दुपारच्या वेळी सूर्य जेव्हा डोक्यावर असतो त्यावेळी शून्य सावलीचा अनुभव घेता येईल. 23.5 अंश उत्तर आणि 23.5 अंश दक्षिण अक्षांश असलेल्या भागातच शून्य सावली पाहायला मिळते. सूर्य अक्षांश रेषेच्या अगदी वर असतो त्यावेळी शून्य सावली अनुभवता येते.
विज्ञानातील या घटनेचा साक्षीदार होण्याची संधी गोमन्तकीयांना मिळणार आहे.
गोव्यात रवींद्र भवन, मडगाव आणि जुंता हाऊस, पणजी येथे नागरिकांसाठी शून्य सावलीचा अनुभव घेण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. नागिरकांना दुपारी १२.१५ते १२.४५ या वेळेत या स्थळांना भेट देता येईल. सर्वांसाठी मोफत प्रवेश असणार आहे.
सूर्य बरोबर डोक्यावर आल्यानंतर आपली सावली आपल्याला दिसत नाही, यालाचा शून्य सावली दिवस म्हणतात. पृथ्वी तिच्या अक्षावर 23.5 अंशांनी झुकल्यामुळे शून्य सावलीची स्थिती निर्माण होते, असे वैज्ञानिक सांगतात. ऋतू बदलण्याचेही हेच कारण असल्याचे तज्ञ सांगतात.
महत्वाचे म्हणजे 23.5 अंश उत्तर आणि 23.5 अंश दक्षिण अक्षांश भागातच शून्य सावली दिवस अनुभवता येतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.