Smriti Irani on her daughter's Goa row:  Dainik Gomantak
गोवा

कन्येच्या गोव्यातील वादाबाबत काय म्हणाल्या केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी; सिली सोल्स कॅफे अँड बार प्रकरण

वडिलांनी पंतप्रधान मोदींची भेट घेण्यामागचे कारणही केले स्पष्ट

Akshay Nirmale

Smriti Irani on her daughter's Goa row: गोव्यातील सिली सोल्स कॅफे अँड बार (Silly Souls Cafe and Bar) वरून गतवर्षी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी यांच्यावर टीका झाली होती. त्याबाबत विचारले असता स्मृती इराणी यांनी या मुद्यावर खुलेपणाते मत मांडले. एएनआय या वृत्तसंस्थेला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत स्मृती ईराणी यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

एएनआयच्या मुलाखतीत स्मृती इराणी यांनी म्हटले आहे की, गोव्याच्या वादात माझ्या मुलीला जाणीवपूर्वक ओढले गेले. माझ्या मुलीला राजकारणात येता येऊ नये, तिला राजकारण करता येऊ नये म्हणून हे केले गेले.

विरोधकांना माझ्या विरोधात काहीही करता आले नाही, त्यामुळे त्यांनी माझ्या मुलांवर निशाणा साधला, असे त्या म्हणाल्या.

गोव्यातील सिली सोल्स कॅफे अँड बारला देण्यात आलेला परवाना बेकायदेशील असून हा परवाना मृत व्यक्तीच्या नावाने दिल्याचा आरोप गोव्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते अॅड. आयरिस रॉड्रिग्ज यांनी केला होता.

या रेस्टॉरंटमध्ये इराणी कुटूंबियांची मालकी आहे, इराणी यांची कन्या हे रेस्टॉरंट चालवते अशी चर्चा तेव्हा रंगली होती. तथापि, याच्याशी आपला काही संबंध नाही, असे तेव्हा ईराणी यांनी स्पष्ट केले होते.

तेव्हा गोवा काँग्रेसने स्मृती इराणी यांच्याच मालकीच्या कंपनीला परवाना देण्यात आला आहे. पण आपला संबंध नाकारून त्या खोट बोलल्या आहेत. त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली होती. त्यासाठी आरटीआय कागदपत्रांचा पुरावाही देण्यात आला होता.

दरम्यान ईराणी यांच्या वडिलांनी घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, माझे वडिल पूर्वी राजीव गांधी यांच्या काळात सक्रिय राजकारणात होते. तेव्हा ते भाजपविरोधी होते.

पण, पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांचे विचार बदलले. माझे वडिल म्हणतात की, पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा मानसन्मान वाढवण्याचे काम केले आहे. वडिलांना मोदींचे आभार मानायचे होते. धन्यवाद म्हणायचे होते.

दरम्यान, काही दिवसांपुर्वीच स्मृती ईराणी यांच्या वडिलांची पंतप्रधान मोदींशी भेट झाली होती. त्या भेटीचा फोटो स्मृती इराणी यांनी शेअर केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT