Som Yag Yadnya  Dainik Gomantak
गोवा

Som Yag Yadnya 2023: यज्ञ का करतात?

गोमन्तक डिजिटल टीम

Som Yag Yadnya Festival 2023 in Goa | सोम याग यज्ञ उत्सव २०२३

- डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले (एमडी आयुर्वेद)

अग्निच्या माध्यमातून ईश्वररूपी पंच महाभौतिक निसर्गातील सर्व तत्वांची उपासना म्हणजे 'यज्ञ' होय. संस्कृतोद्भव वैदिक मंत्रोच्चारासह औषधी घटकांचे ज्वलन करून आपल्या ठायीच्या स्व-चैतन्याचे वैश्विक चैतन्याशी एकीकरण साधण्याचा मार्ग म्हणजेच यज्ञ. मूळ यजधातू पासून निर्मित 'यज्ञ' चा अर्थ अर्चना वा उपासना करणे असा होतो. ऋग्वेदाचा पहिला शब्द हा अग्नि आहे.

नतस्य प्रतिमा अस्ति ।

ईश्वर चैतन्याचे प्रतिमा स्वरूप निर्माण करणे अवघड आहे. वेदांनी ईश्वर तत्वाला उर्जा, ज्ञान व प्रकाश स्वरुप मानळे आहे. ईश्वर ही एक ज्ञानमयी उर्जा असून ती सृष्टीच्या अणू-रेणूमध्ये उपस्थित आहे, असे वेदांचे सांगणे आहे.

ईशावास्यमिदं सर्व ।

सर्व चर व अचर सृष्टी ईश्वर उर्जेतूनच निर्माण झाली आहे.

पंचमहाभौतिक सृष्टीतील निसर्गालाच त्यामुळे वेदांनी ईश्वरत्व दिले आहे. निसर्गातील उर्जेचे प्रमुख दोन स्त्रोत म्हणजेच आकाशात सूर्य व पृथ्वीवर अग्नि आहे त्यामुळे त्यांना ईश्वराचे प्रतिबिंब मानले जातात. निसर्ग तालचक्र या दोन्ही स्त्रोतांच्या माध्यमातून नियंत्रित केले जात असल्यामुळे सूर्य व अग्नि या दोन्ही तत्वांना ईश्वर सदृश्य सर्व उपाधी दिलेल्या आहेत.

जीवनदायक, प्रकाशदायक व रक्षाकर अशा गुणांमूळे अग्निच्या माध्यमातून ईश्वर चैतन्याशी एकरुपता साधता येते, असे वेदांनी प्रतिपादीत केले आहे.

अग्निमीळे पुरोहितमं । वेदांचा प्रमुख प्रतिपाद्य विषय यज्ञ किंवा अग्निउपासना आहे. असे भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात.

सह यज्ञा प्रजा सृष्टवा पुरोबाच्या प्रजापतिही :

यज्ञाच्या बरोबर परमात्माने जीवसृष्टीचे सृजन केले. यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्मानि प्रथमान्यासन्‌ ।

देवानी यज्ञाद्रारे अभ्निस्वरुप असलेल्या ईश्वर शक्तीची उपासना करून देवत्व प्राप्त केले.

यज्ञाच्या नित्य आचरणाने सृष्टीचे नित्यचक्र सुचारू रूपाने चालत राहून मानव व जीवसृष्टी सुखी व आरोग्यपूर्ण राहण्यास मदत होते. यज्ञाचा निसर्गाशी व प्राणाशी निकटचा संबंध आहे त्यामुळे यज्ञीय अग्निमध्ये मासांदिंचे ज्वलन केल्याने नकारात्मकता व विनाशाची वृत्ती निर्माण होते व नैसर्गिक औषधी वनस्पती इ.च्या ज्वलनाने सकारात्मकता, प्रसन्नता, सौमनस्य व पावित्र्य निर्माण होते.

परमसद्‌गुरु श्री गजानन महाराज यांनी १९६९ साली हजारो वर्षानंतर शुध्द वेदप्रतिपादित महासोमयागाचे शिवपुरी अक्कलकोट येथे आयोजन करून पुनश्च एकवार शुध्दीकर यज्ञपरंपरेचे पुनरुज्जीवन केले.

( लेखक हे गुरुमंदिर,बाळाप्पा मठ, अक्कलकोट व विश्व फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत. तसेच श्री गजानन महाराज, शिवपुरी, अक्कलकोट यांचे नातू आहेत)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT