Som Yag yagya 2023: वेद म्हणजे काय?

Som Yag Yadnya 2023
Som Yag Yadnya 2023Gomantak Digital
Published on
Updated on

Som Yag Yadnya Festival 2023 in Goa | सोम याग यज्ञ उत्सव २०२३

डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले (एमडी आयुर्वेद)

वेद हे मानव मात्राला लाभलेले प्राचीनतम ज्ञानभांडार आहे. वेद हा शब्द संस्कृतमधील ‘विद्‌’ या मूळ धातूपासून निर्माण झाला आहे. या शब्दाचा अर्थ ज्ञान असा होतो. वेद शब्दाने विशुद्ध ज्ञान अशा अर्थाचा बोध अपेक्षित आहे. वेद हे कोण्या व्यक्‍तीने रचलेले वा लिहिलेले ग्रंथ नाही असे मानले जाते, अर्थात सामान्यपणे जसे इतर ग्रंथ वा वाड:मय याला लेखक किंवा लेखिका असते तसे हे नाही. ‘गोमन्‍तक-सकाळ’ समूहातर्फे ५ ते १० फेब्रुवारी या कालावधीत सोमयाग यज्ञ आयोजित करण्‍यात आला आहे. त्यानिमित्ताने...

प्राचीन काळामध्ये ऋषीमुनींना उन्मनी अर्थातच ध्यानमग्न अवस्थेमध्ये प्राप्त झालेले ज्ञान आहे. जे ज्ञान ऐकू आले ते वेद. म्हणूनच वेद वाड:मय श्रृती ग्रंथ म्हटले जाते. ऋषीमुनी हे या ग्रंथाचे रचेता नसून ते त्या ज्ञानाचे द्रष्टा मानले जातात. हे ज्ञान त्यांना प्रत्यक्ष सृष्टीचे सृजन करणाऱ्या परमात्मा शक्‍तीकडून प्राप्त झाले, असे त्यांनी कथन केलेले आहे. त्यामुळेच वेदांना अपौरुषेय म्हणजे मानवाने रचलेले नाही, असे म्हटले जाते.

Som Yag Yadnya 2023
Som Yag Yadnya 2023: गोव्यात यज्ञ उत्सव, कधी आणि कुठे वाचा सविस्तर

सृष्टी निर्माण होण्यापूर्वी देखील ज्ञान होते. ज्ञानाच्या आधारे ईश्वराने सृष्टी निर्माण केली असे वेदांमध्ये म्हटले आहे. म्हणजेच संपूर्ण सृष्टी, त्यातील प्रत्येक घटक ऊर्जामय व ज्ञानमय आहे असे वेदांचे म्हणणे आहे. मूळ वेद हे संस्कृत भाषेत लिहिलेले आहेत. संस्कृत म्हणजे संस्कारित व नियोजनबद्ध असलेली शब्दरचना ज्यामध्ये आहे, अशी भाषा मानली जाते. संस्कृत ही कुठल्याही भू-भागाची वा सांप्रदायाची मातृभाषा नसून ती ईश्वरनिर्मित असल्यामुळे तिला देववाणी देखील म्हटले जाते. ईश्वराने या अतिप्राचीन भाषेमध्ये वेद ज्ञानाचे ऋषींना प्रगटीकरण केले.

अनंता वै वेदा :

वेदांचे ज्ञान अनंत व अगाध आहे, असे मानले जाते. ज्ञानाला काळ व दिशा याची मर्यादा नसते. त्यामुळे ज्ञानाचा उगम कधी झाला हे सांगणे अवघड असते. याच कारणामुळे वेदांना अनादि व अनंत मानले जाते. प्राचीन काळी संपूर्ण वेदवाड:मय एकच होते. ज्ञानाचे खंडात्मक वर्गीकरण महर्षी व्यासांनी केल्याचे सांगितले जाते. मूळ एका ग्रंथापासून त्यांनी संकलन करून त्याचे चार खंड निर्माण केले ते म्हणजे ऋगवेद, यर्जुवेद, सामवेद आणि अर्थववेद. हे ज्ञान संरक्षित रहावे, ते समजण्यासाठी सुलभ व्हावे व त्याचा प्रचार, प्रसार करता यावा या हेतूने महर्षी व्यासांनी या चार खंडांमध्ये वेदवाड:मय विभाजित केले आहे.

यथे मा वाचं कल्याणी आवदानि जनेभ्या:

आमची कल्याणमय वाणी म्हणजे धर्मवाणी सकल जणांना ऐकवा, हा वेदांचा आदेश आहे. वेद ज्ञान सर्वांसाठी खुले आहे आणि त्यावर कोणा एकाचा अधिकार नाही. वेद संपूर्ण विश्वमानावचा कल्याणाचा मार्ग दाखवणारे ज्ञानभंडार आहे. संपूर्ण वेदांचे ज्ञान सोप्या शब्दांमध्ये सकल मानव समाजासाठी परमसद्गुरु श्री गजानन महाराज यांनी पंचसाधन मार्ग म्हणजेच यज्ञ, दान, तप, कर्म व स्वाध्याय या सोप्या पद्धतीने प्रकाशित केले.

वेदो अखिलो धर्म मूलं।

अध्यात्म, धर्म व शास्त्र या संपूर्ण ज्ञानाचे मूळ वेदांमध्ये आहे असे मानले जाते. वैदिक ज्ञानाच्या आधारावरच भारतीय अध्यात्म व संस्कृतीचा विकास झाल्याचे बघायला मिळते.

सर्वे भवंतु सुखिन: |

म्हणजे सर्व सृष्टी व त्यातील सर्व जीव सुख, समृद्धी व शांतीने आपले जीवन परिपूर्णतेने जगावे अशी प्रार्थना करणारी वेदांची भूमिका आहे. वेदांनी अखिल जगाला सत्य व प्रकाशाचा मार्ग दाखविला आहे.

(लेखक हे विश्‍‍व फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत. तसेच परमसदगुरु श्री गजानन महाराज, शिवपुरी,अक्कलकोट, यांचे नातू आहेत)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com