Churchill Alemao Dainik Gomantak
गोवा

Goa Latest News: वेलिंगकरांनी धार्मिक द्वेष भावना पसरवू नये; चर्चिल आलेमाव

Goa Latest News: चर्चिलची मागणी: पंतप्रधानही सेंट झेवियरला ‘गोयचो सायब’ मानतात

दैनिक गोमन्तक

Goa Latest News: गोव्यातील तमाम भाविकांच्या भावना ज्या संताकडे जुळल्या आहेत, तो सेंट फ्रान्सिस झेवियर हा ‘गोयचो सायब’ असल्याचे खुद्द भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही मान्य केले आहे, त्यामुळे आता तरी वेलिंगकर पिता-पुत्राने गोव्यात धार्मिक विद्वेष पसरविण्याचे काम बंद करावे, असे आवाहन बाणावलीचे माजी आमदार चर्चिल आलेमाव यांनी केले.

आज वार्का येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आलेमाव यांनी सेंट झेवियरांचा उल्लेख प्रधानमंत्री मोदी यांनी मडगाव येथे झालेल्या सभेत गोयचो सायब असा केल्याने आलेमाव यांनी त्यांचे अभिनंदन केले.

गोव्यात असलेल्या धार्मिक सलोख्याचाही पंतप्रधानांनी गौरवपूर्ण उल्लेख केला होता. या पार्श्वभूमीवर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना, माजी संघचालक सुभाष वेलिंगकर आणि त्यांचे पुत्र शैलेंद्र वेलिंगकर यांच्यावर टीका करताना, आता तरी वेलिंगकर पिता-पुत्रानी डोळे उघडावेत. दुसऱ्यांच्या धर्मावर टीका करण्याचे त्यांनी बंद करावे असे आवाहन केले.

सेंट झेवियरप्रती कित्येक गोमंतकीयांच्या धार्मिक भावना गुंतलेल्या आहेत. गोवेकरांनीच त्यांना ‘गोयचो सायब’ ही पदवी दिली आहे.

मात्र वेलिंगकर हे सेंट झेवियरना ‘गोयचो सायब’ म्हणू नका, असे आवाहन करतात. गोवेकरांनी वेलिंगकर यांना गोयचो सायब म्हणावे, असे त्यांना वाटते का? असा सवाल आलेमाव यांनी केला. पोर्तुगीज पासपोर्टमुळे कित्येक गोवेकरांचे भारतीय नागरिकत्व गेले आहे, त्याबद्दल बोलताना आलेमाव म्हणाले.

...आत्ताच विरोध का?

मतदान यंत्राद्वारे केले जाणारे मतदान बंद करावे, अशी मागणी घेऊन काही काँग्रेस नेते सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. त्यावर भाष्य करताना आलेमाव म्हणाले, २०१२ मध्ये मी जेव्हा या मतदान पद्धतीवर शंका घेतली होती त्यावेळी याच काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी मला वेड्यात काढले होते. तेव्हा जर ही पद्धती बरी होती, तर त्या पद्धतीला आता विरोध का? असा उपरोधिक सवाल त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT