Govind Gaude Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील सुसज्ज मैदान भाड्याने मात्र गावातील मैदानांकडे दुर्लक्ष

सुसज्ज मैदान भाडेपट्टीवर देऊन महसूल मिळवण्याचा व गावची मैदाने व्हेंटीलेटरवर ठेवण्याचा सरकारचा डाव असून याबाबत क्रीडाप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमन्तक

मोरजी : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी 37 कोटी रुपये खर्चून सुविधांनी सुसज्ज केलेले पेडणे सावळवाडा येथील क्रीडा मैदान खासगी कंपनीकडे देण्याचा सरकारचा डाव आहे. तर दुसऱ्या बाजूने गावागावात असणाऱ्या क्रीडा मैदानांवर आजवर सुविधा उपलब्ध केलेल्या नाहीत.

सुसज्ज मैदान भाडेपट्टीवर देऊन महसूल मिळवण्याचा व गावची मैदाने व्हेंटीलेटरवर ठेवण्याचा सरकारचा डाव असून याबाबत क्रीडाप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने का होईना, परंतु शहरातील आणि मुख्य तालुक्यातील मैदानांचा विकास क्रीडा खात्यांतर्गत करण्यात आलेला आहे. त्यातील सावळवाडा पेडणे येथील मैदानाचे रूपांतर इनडोअर स्टेडियम मध्ये करून क्रीडा खात्याकडून यावर एकूण 37 कोटी रुपये खर्च करण्यात आले. परंतु आजवर या साधन सुविधांचा लाभ एक टक्काही क्रीडाप्रेमींना झालेला नाही. सरकारच सुसज्ज असे इनडोअर स्टेडियम मोपा विमानतळ उभारणाऱ्या कंपनीला भाडेपट्टीवर देत आहे. तर गावाेगावच्या मैदानांकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे.

आपल्याकडे प्रथमच क्रीडा खाते आल्याने जसा आपण कला आणि संस्कृती खात्याला न्याय दिलेला आहे. तसाच क्रीडा प्रेमींच्या कलागुणांना देऊ. गावागावात क्रीडा सुविधा पोहचण्याचा प्रयत्न करू.

- गोविंद गावडे, क्रीडामंत्री .

97 लाखांची निविदा काढूनही कंत्राटदार मिळेना !

सध्या पेडणे तालुक्यात मोरजी, मांद्रे, कोरगाव, चोपडे, वारखंड पेडणे , तुये या ठिकाणी क्रीडा मैदाने आहेत. मोरजीतील क्रीडा मैदानाच्या दुरुस्तीसाठी मागच्या पाच वर्षापूर्वी एकूण 97 लाखांची निविदा काढण्यात आली होती. मात्र निविदा कोणत्याच कंत्राटदाराने नेली नसल्याने खर्च वाढून एक कोटी 13 लाखांपर्यंत पोहचला आहे.परंतु तेही काम करण्यास कोणीच कंत्राटदार तयार नसल्याने हे मैदान सध्या आणखी धोकादायक स्थितीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT