Goa Budget 2022 Dainik Gomantak
गोवा

‘गोवा बजेट’चे सनदी लेखापाल संस्थेकडून स्वागत

2022-23 या वर्षासाठी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे सनदी लेखापाल संस्थेच्या गोवा शाखेने स्वागत केले.

दैनिक गोमन्तक

पणजी: मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यापासून, वेळेची तीव्र कमतरता असतानाही डॉ.प्रमोद सावंत हे पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यात यशस्वी झाले. हा अर्थसंकल्प आशादायी असून योग्य दिशेने व योग्य अंमलबजावणी केल्यास राज्याच्या विकासात मोलाची भर पडेल. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 2022-23 या वर्षासाठी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे सनदी लेखापाल संस्थेच्या गोवा शाखेने स्वागत केले.

अर्थसंकल्पाने कोणताही मोठा धमाका केलेला नाही,पण मुख्यमंत्र्यांनी सध्याच्या योजनांमध्ये वाढीव बदलांवर लक्ष केंद्रित केले आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्याचा महसूल आणि संसाधने, अर्थव्यवस्थेच्या सर्व विविध क्षेत्रांमध्ये वितरीत केली आहेत आणि त्यासाठी लहान पॅकेजेस दिली आहेत. सर्व क्षेत्रांना सामावून घेतल्याचे दिसते, असे आयसीएयचे अध्यक्ष, सीए गौरव केंकरे म्हणाले.

केंद्राकडून जीएसटी भरपाई थांबवल्यामुळे जुन्या कर्जाच्या परतफेडीच्या दुहेरी त्रासामुळे राज्याच्या वित्तव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो,असा सावधतेचा इशाराही सनदी लेखापाल संस्थेने दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी करात वाढ न करण्याचा विचार केल्यामुळे, आयसीएआयने कर कार्यक्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणे हा, महसूल वाढवण्याचा सर्वोत्तम मार्ग सुचवला आहे, खऱ्या आणि प्रामाणिक करदात्यांना त्रास होणार नाही,असेही म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT