Weather Impact Dainik Gomantak
गोवा

गोव्याच्या किनार्‍याजवळ उसळलेल्या समुद्राच्या गरक्यात सापडले जहाज

खडबडीत हवामानामुळे 1 ठार तर 4 बेपत्ता.

दैनिक गोमन्तक

Weather Impact: गोव्याच्या (Goa) किनार्‍याजवळ (Goa beach) तटरक्षक दलाने जहाजावरील (Ship) 10 क्रू मेंबर्सपैकी पाच जणांची शुक्रवारी सुटका केली. तटरक्षक दलाने एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढला. तटरक्षक दलाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्याच्या किनार्‍यापासून (Sea shore) दूर असलेल्या वेंगुर्ला रॉक्सच्या उत्तरेला श्री कृष्णा या बोटीला खडबडीत हवामानाचा सामना करावा लागला.

परिणामी चालक दलातील सदस्यांनी बचावासाठी पाण्यात उडी घेतली. यातील चार सदस्य शुक्रवारी सायंकाळपर्यंत बेपत्ता होते. तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बोट महाराष्ट्रातील जयगड येथून गोव्यासाठी निघाली होती. तटरक्षक दल गोवा डीआयजी ए बोस यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर, तटरक्षक दलाने त्यांचे हेलिकॉप्टर चेतक आणि तीन जहाजे शोध कार्य सुरू केले.

एक सदस्य मृतावस्थेत आढळला, तर तीन वेगवेगळ्या मासेमारी नौकांनी वाचवलेल्या तिघांसह इतर पाच जणांची सुटका करण्यात आली. बचावलेल्यांची ओळख अद्याप उघड झालेली नाही.
अद्यापही बेपत्ता असलेल्या चार सदस्यांचा शोध सुरू आहे, असे तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना देणार नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Goa Live News: नागपंचमीसाठी नागोबा सज्ज

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT