Chance of heavy rain with thunderstorm in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात 5 आणि 6 एप्रिल रोजी पावसाचा अंदाज

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गोव्याच्या काही भागात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस

दैनिक गोमन्तक

पणजी : उकाड्याने त्रस्त गोवेकरांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 5 आणि 6 एप्रिल रोजी राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाचा अंदाजाने वाढलेल्या तापमानाने होरपळलेल्या गोव्याचं तापमान काहीसं कमी होण्याचा अंदाज आहे.

हवामान खात्याने येत्या आठवड्यात मंगळवार 5 आणि बुधवार 6 एप्रिल रोजी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाच्या आगमनामुळे हवेत गारवा जरी निर्माण होणार असला तरीही शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू बागायतींचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तसंच काजूचे दर पडण्याचीही शक्यता आहे.

दरम्यान यंदा गोव्यात (Goa) मार्चमध्ये 34.2 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. 2013 नंतरचे मार्च महिन्यातील हे सर्वाधिक तापमान आहे. त्यावेळी सर्वाधिक 34.6 एवढ्या तापमानाची नोंद होती असे वेधशाळेने सांगितले. एप्रिलमध्येही तापमानात सातत्याने वाढच होताना दिसत आहे. येत्या 4 एप्रिलपर्यंत गोवा-कर्नाटक (Karnataka) प्रदेशात पूर्वेकडील वाऱ्यांसह कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे 5 आणि 6 एप्रिल रोजी राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"सद्या श्रावण सुरु आसा, हांवूंय नुस्ते खायना" मासे निर्यातीवरून LOP आलेमाव आणि CM सावंतमध्ये रंगला कोकणी संवाद; Watch Video

Sunburn Festival 2025: 17 वर्षांनी गोव्याला रामराम, यंदाचा 'सनबर्न' होणार मुंबईत; तारखा जाहीर!

Goa Assembly Live: खाणकामावर स्पष्ट अन्याय होत आहे

Goa Assembly:‘मी पत्रकार असतो तर ...’ सरदेसाईंच्या मिश्किल प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा; Watch Video

Mohammed Siraj: 'मी बोल्ड करतो, तेंव्हाच सेलिब्रेशन करतो'! टीका करणाऱ्या इंग्लंडच्या चाहत्यांवर सिराजचा बाऊन्सर

SCROLL FOR NEXT