LOP Yuri Alemao And Ramesh Tawadkar Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session: एकच दिवसाचे विधानसभा अधिवेशन; LOP युरी आलेमाव म्हणतात, 'हा तर लोकशाहीला धोका'

Goa Assembly Winter Session 2025: तारांकित प्रश्न अतारांकित प्रश्नांमध्ये रूपांतर करण्याच्या प्रथेमुळे पारदर्शकता कमी होते आणि लोकशाही तत्त्वांचा ऱ्हास होतो; आलेमाव

Pramod Yadav

पणजी : विधानसभेचे अधिवेशन केवळ एका दिवसापुरते मर्यादित ठेवणे आणि महत्त्वाच्या विषयांवरील चर्चा कमी कालावधीसाठी मर्यादित करणे हा लोकशाहीला मोठा धोका असल्याचे मत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी व्यक्त केले आहे.

सत्ताधारी पक्षाला जबाबदार धरण्यात आणि मतदारांचे प्रतिनिधित्व करण्यात विरोधक महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने विधानसभेतील विरोधी सदस्यांच्या लोकशाही हक्कांचे रक्षण व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे नेते युरी आलेमाव यांनी सभापती व कामकाज सल्लागार समितीचे अध्यक्ष रमेश तवडकर यांना लिहिलेल्या पत्रात केले आहे.

‘‘आमच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी कामकाज सल्लागार समितीने विरोधी पक्षाच्या आमदारांना सभागृहाच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे. तारांकित प्रश्न अतारांकित प्रश्नांमध्ये रूपांतर करण्याच्या प्रथेमुळे पारदर्शकता कमी होते आणि लोकशाही तत्त्वांचा ऱ्हास होतो. हे थांबवण्याची गरज असून लोकशाही प्रक्रियेशी खेळणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे,’’ असे आलेमाव यांनी पत्रात म्हटले आहे.

अधिवेशनाच्या ४८ तास अगोदर प्रश्नांची उत्तरे द्या

‘‘आमदारांनी उत्तरांचा अभ्यास करणे गरजेचे आहे, हे माहीत असूनही त्यांना जाणीवपूर्वक उशीर केला जातो. महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारला जाब विचारण्यापासून रोखण्यासाठी हे केले जाते,' याकडे आलेमाव यांनी लक्ष वेधले.

“अधिवेशनात सर्व मंत्रालयांवर चर्चा व्हावी आणि जनतेचे व राज्याचे प्रश्न मांडता यावेत यासाठी कालावधी निश्चित करण्यात यावा. चालू वर्षात याचा गांभीर्याने विचार व्हावा, अशी अपेक्षा आहे, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: टीम इंडियाला हरवण्यासाठी पाकड्यांचा 'मास्टरप्लॅन', शोएब अख्तर, म्हणाला, 'त्या' फलंदाजाला 2 ओव्हर्समध्ये आउट करा

रामा काणकोणकर हल्ला प्रकरण; गुंड जेनिटोसह आठ जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Goa Children Court: पोटच्या 20 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप, आठ वर्षानंतर लागला निकाल

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

Goa Live Updates: Goa Rain: पुन्हा पावसाचा इशारा!

SCROLL FOR NEXT