Mine Block Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: गाव उद्ध्वस्त होत असेल तर आम्हाला खाण व्यवसाय नकोच! खाणीविरोधात एल्गार

Mining in Goa: मुळगाववासीयांचा ठाम निर्धार

दैनिक गोमन्तक

Mining in Goa: मुळगाववासीयांचा ठाम निर्धार गाव उद्ध्वस्त होत असेल तर आम्हाला खाण व्यवसाय नकोच, या भूमिकेशी ठाम असलेले मुळगाववासीय आता संघटित झाले आहेत.

खाण परिक्षेत्रातून गावाला वगळल्याशिवाय मायनिंग सुरू करण्याचा प्रयत्न झाला, तर तीव्र संघर्ष करतानाच, वेळप्रसंगी खाणीवर ठिय्या मांडू, असा ठाम निर्धार मुळगाववासीयांनी आज (रविवारी) मुळगावात झालेल्या खाण विरोधी जाहीर सभेत केला.

जोपर्यंत खाण परीक्षेत्रातून गावाला बाहेर काढण्यात येत नाही, तोपर्यंत स्थानिक पंचायतीने खाण कंपनीला कोणताच ना हरकत दाखला देऊ नये, असा मुद्दा सभेत उपस्थित करण्यात आला.

मुळगावच्या सरपंच तृप्ती गाड यांच्या अध्यक्षतेखाली गावकरवाडा येथील श्री केळबाई देवस्थानात झालेल्या सभेवेळी उपसरपंच गजानन मांद्रेकर, पंच विशालसेन गाड, मानसी कवठणकर,

सुवासिनी गोवेकर अन्य पंचसदस्य, देवस्थान समितीचे अध्यक्ष वसंत गाड, शेतकरी, कोमुनिदाद, नागरिक कृती समिती आदी ग्राम संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सभेला महिलांसह दोनशेहून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते.

खाण परिक्षेत्रामुळे तूर्त कोणत्या समस्यांचा सामना करावा लागत आहे, ते प्रशांती मांद्रेकर यांनी स्पष्ट केले. खाण सुरू करण्यास ''ना हरकत दाखला'' देणार नाही, तोपर्यंत लोकांच्या मनातील भीती दूर होणार नाही. असे त्या म्हणाल्या.

नागरिक कृती समितीचे अध्यक्ष प्रकाश परब आणि पुतूलो गाड यांनी गावाच्या अस्तित्वासाठी सर्वांनी संघटित होण्याची वेळ आल्याचे सांगितले.

लीजमुळे गाव संकटात : खाण लीज क्षेत्रातून मुळगाव वगळावे, ही येथील जनतेची प्रमुख मागणी आहे. डिचोली खाण ब्लॉकअंतर्गत मुळगावमधील १६४ हेक्टर जमीन खाण लीज क्षेत्रात दाखविली आहे.

गावकरवाडा येथील घरे, मुळगावची ग्रामदेवी श्री केळबाई देवीच्या मंदिरासह अन्य लहान-मोठी धार्मिक स्थळे, शाळा, पंचायतघर यांसह नैसर्गिक जलस्रोत असलेले तलाव खाण परीक्षेत्रात येतात. बंदीपूर्वीही खाण व्यवसायामुळे मुळगावचे अस्तित्व संकटात आले होते, असे ग्रामस्थ यावेळी म्हणाले.

संघटितपणे लढा देणार : मंदिरे, शेती-बागायती, नैसर्गिक जलस्रोत हे गावाचे वैभव आहे. खाण परिक्षेत्रातून गाव वगळला नाही, तर हे वैभव नष्ट होईल, अशी भीती देवस्थान समितीचे अध्यक्ष वसंत गाड यांनी व्यक्त करून आम्ही भावी पिढीला काय उत्तर देणार असा प्रश्न उपस्थित केला. आता संघटितपणे लढा देण्याची वेळ आली आहे.

गावाच्या अस्तित्वासाठी वेळप्रसंगी खाणीवर ठिय्या मांडण्याची तयारी ठेवा, असे आवाहन वसंत गाड यांनी केले. गावाचा प्रश्न सोडवण्यासाठी खाणव्याप्त डिचोलीसह मये, शिरगाव आणि पिळगाव येथील जनतेसह जाहीर सभा घेण्याचे त्यांनी संकेत दिले.

तोपर्यंत दाखला नाही ः खाण परिक्षेत्रामुळे कोणत्या समस्यांचा सामना करावा लागत आहे, ते प्रशांती मांद्रेकर यांनी स्पष्ट केले. खाण सुरू करण्यास ना हरकत दाखला देणार नाही, तोपर्यंत लोकांच्या मनातील भीती दूर होणार नाही. असे त्या म्हणाल्या.

प्रकाश परब, पुतूलो गाड यांनी गावाच्या अस्तित्वासाठी सर्वांनी संघटित होण्याची वेळ आल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

..तांबडया समुद्रातून बेट मागे टाकल्यावर बोट 'सुएझ कालव्या'त शिरली! गोव्यासाठी लढलेल्या वीरांच्या कारावासातल्या भयाण आठवणी

U19 Asia Cup 2025: भारताचा श्रीलंकेला विजयाचा 'धोबीपछाड'; फायनलमध्ये रंगणार भारत-पाक हायव्होल्टेज थरार! VIDEO

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

VIDEO: गोव्यात 'स्पा' सेंटरच्या नावाखाली पर्यटकांची लूट! कळंगुट, बागा किनाऱ्यावर ट्रान्सजेंडरचा वावर, महिलेने उघड केला धक्कादायक प्रकार

Jeffrey Epstein Files: जेफ्री एप्सटीन फाइल्सचा धमाका! डोनाल्ड ट्रम्प, बिल गेट्स यांच्यासह बड्या हस्तींचे फोटो व्हायरल; 18 वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला VIDEO

SCROLL FOR NEXT