Waves Film Market Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात होणार 'WAVES फिल्म बाजार' चे उद्घाटन! 22 फीचर फिल्म; मराठी, कोकणी संस्कृतसह 18 हून अधिक भाषांतील कथा होणार सादर

WAVES Film Market Goa: भारतातील महत्त्वाचा चित्रपट बाजार असलेले WAVES फिल्म बाजार याची १९वी आवृत्ती पुन्हा एकदा गोव्यात आयोजित करण्यात आली आहे

Akshata Chhatre

पणजी: भारतातील महत्त्वाचा चित्रपट बाजार असलेले WAVES फिल्म बाजार याची १९वी आवृत्ती पुन्हा एकदा गोव्यात आयोजित करण्यात आली आहे. ५६व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या बरोबरच हा बाजार २० ते २४ नोव्हेंबर २०२५ दरम्यान गोवा मॅरियट रिसॉर्ट येथे होणार आहे.

को-प्रॉडक्शन मार्केटचे मोठे स्वरूप

यंदाच्या WAVES फिल्म बाजारमध्ये फीचर फिल्म्स आणि डॉक्युमेंटरीजसाठी एक मजबूत को-प्रॉडक्शन मार्केट असेल. आंतरराष्ट्रीय फंडिंग आणि महोत्सवांमध्ये निवड होण्यासाठी प्रकल्पांची विशेष यादी तयार करण्यात आली आहे.

या बाजारात २२ फीचर फिल्म प्रकल्प सादर केले जातील, ज्यात जागतिक कथांचा समावेश आहे. या मार्केटमध्ये भारत, फ्रान्स, यूके, कॅनडा, यूएसए, रशिया, फिलिपिन्स आणि सिंगापूर येथील प्रकल्पांचा समावेश आहे.

हिंदी, उर्दू, बंगाली, मणिपुरी, मराठी, कोकणी, गुजराती, कन्नड, मल्याळम, पंजाबी, काश्मिरी, रशियन आणि संस्कृतसह १८ हून अधिक भाषांतील कथा येथे सादर होतील.

पिचिंग आणि दिग्गज निर्मात्यांचा सहभाग

निवडलेल्या चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या प्रकल्पांचे 'ओपन पिच सेशन' दरम्यान आंतरराष्ट्रीय आणि भारतीय निर्माते, वितरक, फायनान्सर्स आणि सेल्स एजंट्ससमोर सादरीकरण करण्याची संधी मिळेल.

यंदाच्या को-प्रॉडक्शन मार्केटच्या लाइनअपमध्ये किरण राव, विक्रमादित्य मोटवाने, शकुन बत्रा, देवाशिष मखीजा, इरा दुबे, शौनक सेन आणि बाफ्टा पुरस्कार विजेते दिग्दर्शक बेन क्रिचटन यांसारख्या अनुभवी तसेच उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांचा समावेश आहे.

या आवृत्तीत कला, संगीत, संस्कृती, पर्यावरण, शिक्षण आणि लिंग-आधारित विषयांवर आधारित पाच उल्लेखनीय डॉक्युमेंटरी सादर केले जातील.

विशेष भागीदारी

WAVES फिल्म बाजारने एशिया टीव्ही फोरम अँड मार्केट सोबत भागीदारीची घोषणा केली आहे. 'प्रोजेक्ट क्रॉस-एक्सचेंज इनिशिएटिव्ह' अंतर्गत "ग्लोरिया" नावाचा एक प्रकल्प को-प्रॉडक्शन मार्केट फीचरमध्ये समाविष्ट असेल. याशिवाय, NFDC च्या 'हँडपिक्ड फोकस्ड प्रोजेक्ट्स' अंतर्गत "शेम्ड", "स्मॅश" आणि "टायगर इन द लायन डेन"हे तीन प्रकल्प देखील सादर केले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harry Brook: 11 चौकार, 9 षटकार... हॅरी ब्रुकनं 29 चेंडूत कुटल्या 90 धावा; श्रीलंकेच्या गोलंदाजांना धुतलं Watch Video

Goa to Nepal on Electric Bike: गोव्याच्या पोरांची कमाल! 'इलेक्ट्रिक बाईक'वरून गाठलं थेट 'नेपाळ'; 3,300 किमीचा थरार

UGC New Rules: "जातीवरुन कोणाशीही भेदभाव होणार नाही!", युजीसीच्या नवीन 'समानता' नियमावलीवर शिक्षण मंत्र्यांनी स्पष्टचं सांगितलं VIDEO

KL Rahul Retirement: ''मनात संन्यास घेण्याचा विचार..." केएल राहुल क्रिकेटला ठोकणार 'रामराम'? सोशल मीडियावर चर्चांना उधाण VIDEO

Goa Drug Case: 'वार्का'त फ्लॅटवर छापेमारी! 2 लाखांच्या ड्रग्जसह दोघे ताब्यात; गोवा पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT