water wasted Dainik Gomantak
गोवा

काणकोणात दहा कोटींच्या खर्चानंतरही पाण्याची नासाडी

चावडी येथील प्रकार: रस्त्यावर पाणीच पाणी; नागरिकांतून संताप

दैनिक गोमन्तक

काणकोण: काणकोण तालुक्यातील पाणीपुरवठा व वितरण व्यवस्थेत सुधारणा व्हावी, यासाठी दहा कोटी रूपये खर्च करण्यात आले; तरीही पाणी गळती सुरू आहे. या प्रकारामुळे हजारो लीटर पाण्याची नासाडी होत आहे.

चावडी येथील रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने या प्रकाराला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. करदात्यांचे पैसे असे पाण्याबरोबर वाहून जात असल्याने नागरिकांत संताप व्यक्त करण्यात येतो; मात्र या संदर्भात जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्यास सरकारी प्रतिनिधींकडून त्रास दिला जातो, असे येथील काही स्थानिक नागरिकांनी सांगितले.

चावडी येथे भर बाजारात काणकोण नागरी पतसंस्थेच्या शाखेसमोर जलवाहिनीला गळती लागून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. काही ठिकाणच्या जलवाहिनीच्या गळतीबाबत तक्रार करून तीन तीन दिवस झाले तरी जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम वेळेत करण्यात येत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

समस्या सुटणे गरजेचे: पाणी वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी जरी दहा कोटी खर्च झाले असले तरी जलवाहिनीची गळती कायम आहे. या प्रकारामुळे हजारो लीटर पाणी वाया जात असल्याने संबंधित प्रशासनानेही लक्ष देऊन त्वरित दुरुस्ती करून समस्या सोडविणे गरजेचे आहे, असे चावडी येथील नागरिकांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

SCROLL FOR NEXT