सुभाष शिरोडकर Dainik Gomantak
गोवा

Subhash Shirodkar: नियमित अनुदान हा शेतकऱ्यांचा हक्कच; जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर

Subhash Shirodkar: आमोणे-पैंगीण येथे कृषी महोत्सवाचे उद्‍घाटन

दैनिक गोमन्तक

Subhash Shirodkar: शेतकऱ्यांना विविध योजनेतून मिळणारे अनुदान प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपूर्वी मिळणे गरजेचे आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याला 1 तारखेला वेतन मिळत असेल, तर सर्वांचे पोषण करणाऱ्या शेतकऱ्यांनासुद्धा नियमित मोबदला मिळणे हा त्यांचा हक्क आहे.

असे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी आमोणे - पैंगीण येथे आयोजित कृषी मेळाव्यात सांगितले. कृषी व जलस्त्रोत खात्यातर्फे पश्चिम घाट विकास कार्यक्रमांतर्गत काणकोणात कृषी महोत्सवाचे आयोजन आमोणे येथील संस्कृती भवनात करण्यात आले. यावेळी पैंगीणच्या सरपंच सविता तवडकर, जिल्हा पंचायत सदस्य शाणू वेळीप, शोभना वेळीप, आत्माचे प्रकल्प अधिकारी शिवराम नाईक गावकर, जलस्त्रोत खात्याचे कार्यकारी अभियंते पाटील,

कृषी संचालक नेविल अल्फोन्सो, उपसंचालक संदीप फळदेसाई, गावचे बुधवंत सुरेश गावकर, संतोष वेळीप, विभागीय कृषी अधिकारी वृंदा वेळीप, श्रीस्थळ पंचायतीच्या सरपंच सेजल‌ गावकर, उपसरपंच पुनम गावकर, नागेश कोमरपंत, खोतिगावचे सरपंच आनंदु देसाई उपस्थित होते.

ट्रायफेड माध्यमातून ६५ कोटी रुपयांचा कृषी क्षेत्रातील औद्योगिक प्रकल्प उभारणे शक्य आहे. काणकोण व्हिजन आणि मिशन या माध्यमातून हा विचार पुढे नेण्यात येत आहे. कृषी उत्पादनाचे मूल्यवर्धन करणे,

डेअरी इस्टेट स्थापन करून रोजगार निर्माण करणे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपली मानसिकता बदलून पारंपरिक व आधुनिक तंत्रज्ञानाची जोड घेणे आवश्यक असल्याचे मत सभापती रमेश तवडकर यांनी व्यक्त केले.

विविध स्पर्धांतील यशवंत

विभागीय कृषी कार्यालयाने आयोजित केलेल्या वेगवेगळ्या स्पर्धांच्या विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. त्यामध्ये चित्रकला स्पर्धेत सान्वी सिद्धेश कुवळेकर, राजीव नाईक, खुशबू शेख, निबंध स्पर्धेत सुजया, विभुती भैरली व अश्वेक गावकर, फुलांची वेणी घालणे स्पर्धेत शिल्पा लोकर, ज्योविता वेळीप व सोनाली वेळीप, भरड धान्य पाककृती स्पर्धेत लक्ष्मी राम गावकर, सरस्वती गावकर व मल्लिकार्जुन स्वयंसाहाय्य गटाला बक्षीस प्राप्त झाले.

15 शेतकऱ्यांचा गौरव

कृषी मेळाव्यात प्रगतशील शेतकरी म्हणून तालुक्यातील १५ शेतकऱ्यांचा सभापती व जलस्रोतमंत्र्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यात तोळू वेळीप (खोतिगाव), रमेश गावकर (झिल्तावाडा), महेंद्र भंडारी (पैंगीण), रोहिदास टेंग्से (लोलये), अजय ऊर्फ अजित लोलयेकर (लोलये), ब्रिजेश फळदेसाई (तुडल), संतोष कोमरपंत (देवाबाग), अर्जुन तवडकर (आमोणे), तिंबलेश कोमरपंत, सचिन नाईक, विवेकानंद प्रभुगावकर, दिनेश कोमरपंत, बाळकृष्ण देसाई (भैरेलीवाडा), अर्जुन तवडकर (शिशेव्हाळ), बाबू नागू वेळीप (येडा) यांचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

SCROLL FOR NEXT