Fish Festival: पणजीत मेगा फिश फेस्टिव्हल

Fish Festival: 2 ते 4 रोजी आयोजन : शोभिवंत मत्स्यालय गॅलरी विशेष आकर्षण
Fish Festival
Fish FestivalDainik Gomantak

मत्स्यव्यवसाय संचालनालयाने अॅक्वा गोवा मेगा फिश फेस्टिव्हल 2024 च्या 7 व्या आवृत्तीची घोषणा केली आहे. हा महोत्सव राज्यातील मासेमारी संस्कृतीला चालना देण्यासाठी एक मोठे व्यासपीठ ठरणार आहे. 2 ते 4 रोजी दरम्यान कांपाल एसएजी मैदानावर हा महोत्सव भरणार आहे.

Fish Festival
Goa Police: फातोर्डा पोलिस निरीक्षक हाजीर हो!

मिळालेल्या माहितीनुसार, या फेस्टिव्हलमध्ये मत्स्यविषयक जागरूकता सेमिनार, कार्यशाळा आणि बी2बी परस्पर संवादाच्या श्रेणीसह, सागरी जीवनाविषयी सर्व काही जाणून घेण्यासाठी हा उत्सव लोकांसाठी ''वन स्टॉप डेस्टिनेशन'' ठरणार आहे.

ॲक्वा गोवा मेगा फिश फेस्टिव्हल 2024 चे शोभिवंत मत्स्यालय गॅलरी हे विशेष आकर्षण राहील, ज्यामध्ये 100 पेक्षा जास्त विविध प्रकारचे विदेशी मासे या दिवसांमध्ये अभ्यागतांसाठी प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत.

अभ्यागतांमध्ये शेतकरी व मच्छीमार संघटना, मासेमारी उद्योगातील उद्योजक, एक्वा कल्चर सल्लागार, पर्यावरणवादी, सरकारी अधिकारी, विद्यार्थी व्यापार व्यवसाय शिष्टमंडळ, हॉटेल्स, रिसॉर्ट्स, फास्ट फूड चेन, रेस्टॉरंट्स आणि सामान्य लोकांचा समावेश असेल. सल्लागार संस्था, वितरक आणि डीलर्स, आयातदार/निर्यात/निर्माते, संशोधन संस्था, इको-टूरिस्ट आणि सामान्य लोकाही या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.

महोत्सवात विविध प्रकारचे मनोरंजन कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. ३ दिवसांच्या भव्य कार्यक्रमात गोव्याचे उत्कृष्ट खाद्यपदार्थ देणारे फूड स्टॉल्स आणि विविध पदार्थ चाखण्यास लोकांना मिळणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com