Subhash Shirodkar ज्या शेतकऱ्यांनी शेती करणे सोडले आहे, त्यांना पुन्हा शेतीकडे वळविण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून जलसंसाधन खात्याने राज्यातील 150 तळ्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे ठरविले आहे.
यावर्षी किमान तीन हजार शेतकऱ्यांना पुन्हा शेतीकडे वळविण्याचा आमचा मानस आहे, असे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.
फातोर्डा येथील दवंदे तळ्यातील गाळ उपसण्याच्या आणि संरक्षक भिंत उभारण्याच्या कामाचा शुभारंभ आज शनिवारी मंत्री शिरोडकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई आणि नगरसेवक उपस्थित होते.
फातोर्डा मतदारसंघांत सुमारे 50 लाख रुपये खर्चून दोन कामे हाती घेण्यात आलेली आहेत. तसेच या मतदारसंघात पाच विहिरी उपसण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे मंत्री शिरोडकर यांनी सांगितले.
दरम्यान, आमदार सरदेसाई यांनी फातोर्डा मतदारसघांत जलसंसाधन खात्याने कामे हाती घेतल्याबद्दल मंत्री शिरोडकर यांचे आभार मानताना शेतकऱ्यांना पोषक असे उपक्रम सरकारने हाती घ्यावेत असे आवाहन केले.
50 ते 60 कोटी करणार खर्च:-
राज्य सरकारच्या योजनांबाबत माहिती देताना मंत्री शिरोडकर म्हणाले की, 150 तळ्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी 50 ते 60 कोटी रुपये खर्च येणार आहे.
बोरी येथील श्री नवदुर्गा तळीवर सुमारे 3 कोटी, करमळी तळ्यावर सुमारे 2.5 कोटी तर मायमोळे-वास्को येथील तळीवर दीड कोटी रूपये खर्च करण्यात येतील.
या योजनेला शेतकऱ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असून शिरोडा मतदारसंघात यंदा 300 शेतकरी पुन्हा शेतीकडे वळले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.