Water Problem Dainik Gomantak
गोवा

Water Problem: बादे, बंदिरवाडा येथे पाण्याची समस्या; त्रस्त नागरिकांचा साबांखावर घागर मोर्चा

Chapora News: मोर्चेकरांमध्ये महिलांचा सहभाग लक्षेवधी होता. दरम्यान, सहाय्यक अभियंत्यांनी येत्या काही दिवसांत हा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन रहिवाशांना दिले.

दैनिक गोमन्तक

Water Problem in Chapora

शापोरा येथील बादे, बंदिरवाडामध्ये मागील महिन्याभरापासून पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण झाल्याने त्रस्त नागरिकांनी आज मंगळवारी (ता.२८) म्हापसा येथील साबांखाच्या पाणीपुरवठा विभागावर घागर मोर्चा काढत अधिकार्‍यांना जाब विचारला.

मोर्चेकरांमध्ये महिलांचा सहभाग लक्षेवधी होता. दरम्यान, सहाय्यक अभियंत्यांनी येत्या काही दिवसांत हा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन रहिवाशांना दिले.

मागील अनेक वर्षांपासून बादे, बंदिरवाडामध्ये पाण्याची समस्या प्रामुख्याने भासते. दरवेळी लोक कार्यालयावर धडक मोर्चा घेऊन येताच पाणीपुरवठा काही दिवासांसाठी सुरळीत होतो. त्यानंतर, पुन्हा ये रे माझ्या मागल्या असे म्हणत ग्रामस्थांनी अधिकार्‍यांना सुनावले.

गेल्या महिन्याभरापासून अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने लोकांची मोठी पंचाईत होत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. वर्षानुवर्षे ही समस्या असूनही सार्वजनिक बांधकाम खाते काहीच उपाययोजना हाती घेत नाही, असा आरोपही ग्रामस्थांनी केला.

तसेच, पाणीपुरवठा विभागाचे पर्यवेक्षक व ऑपरेटर पाणी अन्यत्र वळवतात. त्यामुळे आम्हाला पाणी मिळत नसल्याचे आरोपही काही मोर्चेकर्‍यांनी केला. त्याचप्रमाणे, पाणीपुरवठा टँकर वेळेत उपलब्ध होत नसल्याची खंत मोर्चेकरांनी बोलून दाखविली.

नीलेश गोवेकर म्हणाले की, मागील काही महिन्यांपासून आमच्या परिसरात अनियमित पाणीपुरवठा होतोय. अधिकार्‍यांना विचारल्यास जलवाहिनींना गळती लागली आहे किंवा थातुरमातुर उत्तरे देतात. परंतु, पाण्याअभावी लोकांची गैरसोय होते व याकडे कुणीच लक्ष देत नाही. मुळात लोक दररोज किती म्हणून पाणी साठवून ठेवणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ज्ञानेश्वर पेडणेकर तसेच पार्वती नागवेकर म्हणाल्या की, हा प्रश्न आजचा नाही. मागील कित्येक वर्षांपासून ही समस्या जैसे थे आहे. जो पाणीपुरठा होतो तो पुरेसा नसतो. याचा जाब विचारण्यासाठीच आम्ही साबांखा कार्यालयात आलो होतो. दरवेळी फक्त उडवाउडवीचे उत्तरेच मिळतात. येत्या काही दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन अधिकार्‍यांनी पुन्हा दिल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Sand Mining Goa: राज्‍याची संपत्ती सांभाळा, बेकायदा वाळू उत्खननप्रकरणी अधिकाऱ्यांना न्‍यायालयाचे निर्देश

Communidade Land: सावईवेरे कोमुनिदाद कुणाच्या हिताआड येणार नाही पण...! पदाधिकाऱ्यांचे पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण

Ponda: सत्य न जाणता ढवळीकरांवर आरोप करू नका! बांदोडा सरपंचांचा पाटकरांना सल्ला, मतांचा घोळ झाल्याच्या दाव्याला उत्तर

Goa: जिल्हा न्यायालयात आजी-माजी खासदार-आमदारांवर 22 प्रकरणे, हायकोर्टातही 2 खटले प्रलंबित

Goa healthcare policy: महागडे उपचार आता सर्वांसाठी परवडणार; दुर्मिळ आजारांवरील औषधांसाठी राज्यात 'अभिनव किंमत' धोरण राबवण्याची सरकारची घोषणा

SCROLL FOR NEXT