Vasco water pollution Dainik Gomantak
गोवा

Vasco: नाला, तळ्यातील पाणी झाले ‘काळेकुट्ट’! मेस्तवाडा- मायमोळेतील प्रकार; लपून सांडपाणी सोडले असल्याची उलटसुलट चर्चा

Maimollem Lake Goa: दरवर्षी ही परिस्थिती उद्भवत असल्याचा दावा बेलाबाय येथील काही रहिवाशांनी केला आहे. यासंबंधी योग्य उपाययोजना अद्याप हाती घेण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.

Sameer Panditrao

वास्को: भुटेभाट-मेस्तवाडा येथील नाल्याचे तसेच मायमोळे तळ्यातील पाणी काळेकुट्ट झाल्याने तसेच त्या पाण्याला दुर्गंधी येऊ लागल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

याप्रकरणी दखल घेताना मुरगावचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांनी कोणीतरी नाल्यामध्ये सांडपाणी सोडल्याची शक्यता वर्तविली आहे.

बेलाबाय येथील नाल्यातील सांडपाण्याचा निचरा व्हावा यासाठी तेथे जेसीबीद्वारे काम सुरू केले आहे. मात्र, हे सांडपाणी कोणी सोडले, सांडपाणी कोठून आले, हे प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. बेलाबाय येथे नाल्याकाठानजीक राहणाऱ्यांनी या दुर्गंधीचा आरोग्यावर परिणाम होत असल्याचे सांगितले.

येथील मायमोळे तळे व बायणा येथून जुन्ता वसाहत, भुटेभाट, मेस्तवाडा, बेलाबाय, ओरुले येथून वाहत येणाऱ्या नाल्याचे पाणी अतिशय काळेकुट्ट झाल्याबद्दल येथे उलटसुलट चर्चा सुरू झाली होती.

या पाण्याला दुर्गंधी येऊ लागल्याने कोणीतरी नाल्यामध्ये प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हे पाणी भुटेभाट येथील शेतजमिनीत मिसळल्याने तेथील शेतकऱ्यांनीही संताप व्यक्त केला आहे.

दरवर्षी ही परिस्थिती उद्भवत असल्याचा दावा बेलाबाय येथील काही रहिवाशांनी केला आहे. यासंबंधी योग्य उपाययोजना अद्याप हाती घेण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले. या दुर्गंधीमुळे घरात राहणेही कठीण झाले आहे. त्याचप्रमाणे नाल्याच्या काठावर जी झाडेझुडपे उगवली आहेत, ती तोडण्याचे कष्ट संबंधित घेत नसल्याचाही दावा त्यांनी केला. याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने तसेच जलस्रोत विभागाने दखल घेण्याची गरजही रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

पाण्याच्या दुर्गंधीचा त्रास

मायमोळे तळ्यात ओरुलेच्या बाजूच्या नाल्यातून येणाऱ्या सांडपाण्यामुळे मायमोळे तळ्यातील पाणी काळेकुट्ट झाले आहे. तेथून जाणाऱ्या या पाण्याची दुर्गंधी सहन करावी लागत आहे. एका बाजूने रेल्वेच्या भुयारी रस्त्याच्या बाजूने येणारे तांबूस पाणी तर दुसऱ्या बाजूने काळेकुट्ट सांडपाणी वाहत असल्याचे वास्कोवासीयांना दिसून येत आहे.

चोरीछुपे प्रकार

कोणीतरी चोरीछुपे त्या नाल्यामध्ये सांडपाणी सोडले असल्याचा दावा केला. यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. बेलाबाय येथील नाल्याचे पक्क्या स्वरूपात बांधकाम करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Inspiring Story: विश्‍वविजेतेपदाची 'गंगा' आली अंगणी... सोलापूरच्या शेतकरी कुटुंबातील गंगा कदमची प्रकाशझोतातील कामगिरी

क्रौर्याचा कळस! होमवर्क न केल्यानं 4 वर्षांच्या मुलाला कपडे काढून झाडावर लटकवलं, पाहा व्हिडिओ

Margao: मडगावात शनिवारी वीजपुरवठा खंडित! 'या' भागांमध्ये चालणार दुरुस्तीचं काम

Bicholim: डिचोली 'राधाकृष्ण'मध्ये पोषक आहारावर कार्यशाळा उत्साहात; डिचोली रोटरी क्लबतर्फे आयोजन, प्रश्नमंजूषा स्पर्धेलाही प्रतिसाद

Goa Tourism: पर्यटन हंगामास सुरुवात; विदेशी पर्यटकांची संख्या घटली, देशी पर्यटकांत वाढ

SCROLL FOR NEXT