Vijai Sardesai  Dainik Gomantak
गोवा

Fatorda Water Supply : फातोर्डात पाण्याची पाईपलाईन बदलण्याच्या कामाला सुरवात ; विजय सरदेसाई

सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत जुने जीआय पाईप बदलून त्याजागी मोठे पीव्हीसी पाईप घातले जाणार आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी : फातोर्डा येथील प्रभाग 2 व 3 मध्ये पाण्याच्या जुन्या पाईपलाईन बदलण्याच्या कामाला सुरवात झाली. फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले की, 900 मीटर पाईपलाईन बदलण्याच्या तीन कामांसाठी 23 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत जुने जीआय पाईप बदलून त्याजागी मोठे पीव्हीसी पाईप घातले जाणार आहेत.

फातोर्डा मतदारसंघातील विकासकामांचे पूर्वीच नियोजन करण्यात आले होते. मूलभूत सुविधा उपलब्ध करणे, सिवरेज पाईपलाईन, वीजपुरवठा यासारखी कामे पूर्ण झालेली असून सद्या केवळ त्यात सुधारणा करण्याचे काम सुरू असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष व प्रभाग 3 चे नगरसेवक लिंडन परेरा, 2 चे नगरसेवक जॉनी क्रास्तो, नगरसेवक पूजा नाईक, राजू नाईक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी चांगल्या पाईपलाईनची आवश्यकता आहे. मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला पाणी मिळावे यासाठी आमचे प्रयत्न आहेत. मात्र, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गोव्याचे पाण्याचे स्रोत कर्नाटकला देण्याच्या प्रयत्नात आहेत.

- विजय सरदेसाई, आमदार, फातोर्डा मतदारसंघ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दक्षिण गोव्यातील खाण कामगार, खनिज वाहतूकदारांना काम मिळणार; 10 दहा ठिकाणी साठवलेल्या खनिजाचा लिलाव होणार

अभिनेता गौरव बक्शी पुन्हा अडचणीत, ओल्ड गोव्यात गुन्हा दाखल; मालमत्तेत घुसून धमकावल्याचा आरोप

Gold And Silver Price: सोन्या-चांदीच्या दराला मोठा ब्रेकडाऊन! 'एवढ्या' हजारांनी स्वस्त झाली चांदी, सोन्याच्याही दरात घसरण; ग्राहकांना खरेदीची सुवर्णसंधी

Goa Tourism : जोडीदारासह 'निवांत' ठिकाणी जायचंय? गोवा ठरेल रोमँटिक गेटवे, वाचा परफेक्ट टूर गाईड

Viral Video: ''पडला तरी पठ्ठ्यानं बिअरचा कॅन सोडला नाही...'', बेदरकार तरुणांचा व्हिडिओ व्हायरल, नशेतील स्टंट पडला महागात; नेटकऱ्यांनीही घेतली मजा

SCROLL FOR NEXT