Goa Water Problem Dainik Gomantak
गोवा

Tiswadi: तिसवाडीत दिवसभर पाणीबाणी! ओपा जलवाहिनीत बिघाड; रात्रभर दुरुस्ती काम

Goa Water Shortage: ओपा येथून तिसवाडी तालुक्याला होणाऱ्या मुख्य जलवाहिनीचा जोड पाण्याच्या दाबामुळे तुटल्याने त्याचा पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला.

Sameer Panditrao

पणजी: ओपा येथून तिसवाडी तालुक्याला होणाऱ्या मुख्य जलवाहिनीचा जोड पाण्याच्या दाबामुळे तुटल्याने त्याचा पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. शुक्रवारी सकाळी काही वेळ पाणीपुरवठा झाला, तर सायंकाळी पाणी न आल्याने तिसवाडी तालुक्यातील जनतेला पाणी टंचाईचा सामना करावा लागला. ओपा जल प्रकल्पातील जलवाहिनीत झालेल्या बिघाडाचे दुरुस्तीकाम सध्या युद्ध पातळीवर सुरु आहे.

नळपाणी पुरवठा होणार नसल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे कळविले जात होते. परंतु पाणीपुरवठा न झाल्याने अनेकांनी नगरसेवक, आमदारांच्या कार्यालयात फोन करून याविषयी विचारणा केली. त्यानंतर काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवण्यात आला.

ओपा येथून जलवाहिनीतून आल्तिनो येथील टाक्यांमध्ये पाणी पोहोचण्यासाठी किमान एक तासावर कालावधी लागतो. त्यानंतर टाक्यांमध्ये पाणीसाठा झाल्यानंतरच पाणीपुरवठा केला जाऊ शकतो. त्यामुळे रविवारी पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.

अल्प पाणीपुरवठा

दुरुस्तीकाम पूर्णत्वास येत असतानाच पुन्हा या कामात बिघाड झाला. त्यामुळे हे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. जलवाहिनीत झालेल्या बिघाडामुळे ४० एमएलडी प्रकल्पातील पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. सध्या ओपातील २७ एमएलडी प्रकल्पातील पाणी पणजीसह ताळगाव व इतर भागाला सुरू करण्यात आला आहे.

पण तो पुरेसा नाही. त्यामुळे बऱ्याच भागात अजून पाणी पोचलेले नाही. ४० एमएलडी प्रकल्पातील जलवाहिनी जोपर्यंत दुरुस्त होत नाही, तोपर्यंत पुरेसा पाणीपुरवठा होणे शक्य नाही. सध्या युद्धपातळीवर हे दुरुस्तीकाम सुरू असून वरिष्ठ अधिकारी या कामावर नजर ठेवून आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'रामा'च्या न्यायासाठी पणजीत काढलेला मोर्चा अवैध असल्याचा आरोप; युरी आलेमाव, विजय सरदेसाई यांच्यासह 450 जणांविरोधात गुन्हा

Sanguem: ..अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली! सांगेतील माय-लेकीला मिळाला हक्काचा निवारा; मंत्री फळदेसाईंचा पुढाकार

Goa Coconut Price: नारळ अजून महागच! टोमॅटो, कांदाही भडकला; वाचा ताजे दर

Goa News Live: सुर्ल फेरीबोट कर्मचाऱ्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

Zilla Panchayat Election: गोवा फॉरवर्ड, ‘आप’कडून जोर, काँग्रेस स्‍वस्‍थच! जिल्‍हा पंचायत निवडणूक; सरदेसाईंकडून उमेदवार चाचपणी

SCROLL FOR NEXT