Pipeline Burst Dainik Gomantak
गोवा

Pipeline Burst: सांतिनेज जंक्शन परिसरात जलवाहिनी फुटली, हजारो लिटर पाणी वाया

दरम्यान चरावणे सत्तरी भागात पाणीपुरवठा करणारी देखील पाईपलाईन फुटली

गोमन्तक डिजिटल टीम

Pipeline Burst सध्या गोव्यातील काही भागात पाणी टंचाई जाणवत असताना जल वाहिन्या फुटण्याचे प्रकार घडत आहेत. पणजी नजीक सांतिनेज जंक्शन परिसरात आज संध्याकाळच्या सुमारास जलवाहिनी फुटण्याची घटना घडली आहे.

यात हजारो लिटर पाणी वाया गेले असून यासंबंधी अधिक माहिती प्राप्त होऊ शकली नाही.

दरम्यान आज चरावणे सत्तरी भागात पाणीपुरवठा करणारी एक पाईपलाईन फुटून हजारो लीटर पाणी वाया गेले आहे. या भागात आधीच कमी आणि नियमित पाणीपुरवठ्याची तक्रार सतत होत असते.

पाणी टंचाईचा मोठा त्रास या भागातील ग्रामस्थांना सहन करावा लागतो. त्यातच आता येथे पाईपलाईन फुटून हजारो लीटर पाणी वाया गेले आहे.

चरावणे गावात तीन चार ठिकाणी पाण्याची पाईपलाईन कित्येक दिवसापासुन फुटली असून त्यातून पाण्याची गळती होत आहे. गळतीच्या प्रमाणात अनेक ठिकाणी वाढ झाली आहे. त्यातून हजारो लीटर पाणी वाया जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT