Goa Floods प्रेमानंद नाईक
गोवा

Goa Floods: म्हादईचा कहर, प्रसिद्द शांतादुर्गा देवस्थान पाण्याखाली

सत्तरी तालुक्यातून वाहणारी म्हादई नदी व रगाडा नदिने रौद्ररुप धारण करत आसपासची गावे आपल्या कवेत घेतली आहे.

दैनिक गोमन्तक

गुळेली: सत्तरी तालुक्यातून वाहणारी म्हादई नदी व रगाडा नदिने रौद्ररुप धारण करत आसपासची गावे आपल्या कवेत घेतली आहे.गुळेली, कणकिरे,धामसे, मुरमुणे, पाडेली, सावर्शे, गांजे उसगाव आदी नदीलगतच्या गावात पाणी शिरले असून अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे नुकसानीस सामोरे जावे लागत आहे.(Water of Mhadai river floods started flowing into village in Goa)

Goa Floods

सत्तरीतील वाळपई मतदार संघातील गुळेली ग्रामपंचायत क्षेत्रातील पैकूळ येथील रगाडा नदीवरील मिनी पूल रगाडा नदीच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला असून यामुळे पैकूळ गावाचा संपर्क तुटला आहे.सदर पूल ऐशीच्या दशकातील असल्याने जूना झाला होता आणि नवीन पूलाची मागणी लोक करत असताना आता हा पूल कोसळल्याने या गावातील नागरीकांसमोर वाहतूकीचा प्रश्न उत्पन्न होणार आहे.

Goa Floods

प्रेमानंद नाईकया गावात जाण्यासाठी हा पूलच एक मार्ग होता. गुळेलीत शांतादुर्गा देवस्थान परीसर पुर्णपणे पाण्याखाली गेला. म्हादई नदीची पाण्याची पातळीत वाढ होऊन नदिपासून सुमारे पाचशे ते आठशे मिटरवर असलेल्या देवळाजवळ पाणी पोहोचून देवळाच्या गर्भगृहात आणि जवळच्या छोट्या मंदिरात पाणी पोचले आहे.

Goa Floods

प्रेमानंद नाईकगुळेलीतील नाबर बधुंच्या तिन घराला पाण्याने वेढा घातला. रगाडा नदीच्या पाण्याचा प्रवाह बदलत आहे. रामनाथ सावंत व यशवंत सावंत यांच्या बागायतीतून पाण्याचा मोठा प्रवाह थेट नाबर बंधूंच्या बागायतीत पोचत त्या ठिकाणी असलेल्या विनय नाबर यांचे घर अर्धे बुडाले आहे.तसेच गुळेलीचे पंचसदस्य अनिल गावडे यांच्या घरासमोर गुळेली पंचायत घराजवळ पाणी पोचले आहे.तसेच तेजस्विनी विवेक नाबर, माजी सरपंच विशांत नाबर यांच्या घरात पाणी शिरल्यामुळे नुकसान झाले आहे.गावकऱ्यांच्या मदतीने घरातील काही सामान वरच्या मजल्यवर ठेवण्यात आल्याचे सांगितले. रोहिदास गावडे यांच्या घरात पाणी शिरले.

Goa Floods

कणकीरे येथील सखल भागातील40 घरात पाणी भरले आहे.त्यातील तीन घरे कोसळली आहे. म्हारवाडा येथील फडते कुटुंबीयांच्या घरात पाणी पोचले असून रगाडा नदीचा पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने घरा शेजारी ठेवलेल्या वाहनांना बांधून ठेवण्याची पाळी त्यांच्यावर‌आली आहे.

Goa Floods

94 वर्षापूर्वीची पुनरावृत्ती

येथील जेष्ठ नागरिक रामनाथ सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या लहानपणी त्यांनी आपल्या आजोबा कडून ऐकल्याप्रमाणे सुमारे 94 वर्षीपूर्वी असापूर येऊन गेला होता तेव्हा नदीच्या पात्रापासून पाणी अशाच प्रकारे खूप वर आले होते.

Goa Floods

1980-82सालीही पूर आला होता मात्र तो एवढा भयंकर नव्हता असे यावेळी त्यांनी सांगितले. पूरापासून बचाव करण्यासाठी यंत्रणाच नाही भविष्यात परत असा पूर आला तर त्या पासून या भागातील नागरीकांचा बचार करण्यासाठी ठोस अशी यंत्रणाच या भागात उपलब्ध नसल्याचे जाणवते. म्हादई नदी व रगाडा नदी याच्या मधोमध असलेला हा भाग दोन्ही बाजूला पाणी वाढले तर कुठे आतबाहेर जाणे शक्य नाही.

Goa Floods

बागायतींचे अतोनात नुकसान झाले असून लाखाच्या घरात नुकसान होण्याची शक्यता आहे. काल परवा पासून कोसळणाऱ्या पावसामुळे काल संध्याकाळ पासूनच येथील रस्ते पाण्याखाली जाण्यास सुरुवात झाली होती.त्यामूळे रात्रपाळीच्या कामाला गेलेले या भागातील नागरीक अडकून पडले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT