water metro Goa Dainik Gomantak
गोवा

Water Metro in Goa: गोव्यात येतेय पहिलीवहिली 'वॉटर मेट्रो', मुरगाव ते तिसवाडी आता करा जलप्रवास; वाचा माहिती

Mormugao to Tiswadi water transport: राज्यातील वाहतूक आणि पर्यटन क्षेत्रात मोठे परिवर्तन घडवून आणण्यासाठी 'वॉटर मेट्रो प्रकल्प' महत्त्वाची भूमिका बजावेल

Akshata Chhatre

First water metro project in Goa: गोवा राज्यातील वाहतूक आणि पर्यटन क्षेत्रात मोठे परिवर्तन घडवून आणण्यासाठी 'वॉटर मेट्रो प्रकल्प' महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास मंत्री सुभाष फळदेसाई यांनी व्यक्त केला आणि यालाच अनुसरून गोव्याला लवकरच आपला पहिला वॉटर मेट्रो प्रकल्प मिळणार आहे हा प्रकल्प वास्को (मुरगाव) आणि दोनापावला (तिसवाडी) यांना जोडणारा असेल. या प्रकल्पाच्या माध्यमातून रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यासह राज्याच्या पर्यटन क्षेत्रालाही मोठे बळ मिळेल, असे अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.

प्रकल्पाची अंमलबजावणी आणि उद्दिष्टे

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्री सुभाष फळदेसाई यांनी कोची मेट्रो रेल कॉर्पोरेशन (KMRL)च्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि कोची मेट्रोचा अनुभव गोव्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.

वास्को येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, हा प्रकल्प सध्या केंद्राच्या सहकार्याने मूल्यांकन केला जात आहे. प्रवाशांसाठी आणि पर्यटकांसाठी वाहतुकीचा एक शाश्वत आणि प्रभावी पर्याय उपलब्ध करून देण्याचे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे, जेणेकरून प्रदूषण कमी होऊन वेळ आणि इंधनाची बचत होईल.

राज्याचा जलमार्ग आणि विकासाची नवी दिशा

गोव्यात सुमारे ९० किलोमीटर लांबीचे अंतर्गत जलमार्ग आहेत. तसेच राज्यात अनेक बेटे आहेत, जी त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे पर्यटनासाठी लोकप्रिय झालेली आहेत. या ठिकाणी जलमार्गाने प्रवास करणे सोयीचे ठरते. अशा ठिकाणांना वॉटर मेट्रो प्रकल्पाच्या माध्यमातून जोडल्यास राज्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल आणि या प्रदेशाचा सर्वांगीण विकास होईल, असे फळदेसाई म्हणाले होते.

हा प्रकल्प केवळ एक वाहतूक साधन नसून, राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा आणि गोव्याला एक आधुनिक, पर्यावरणपूरक पर्यटन स्थळ म्हणून ओळख देणारा ठरेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यामुळे स्थानिक रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कोणाचीही गय नाही! रामा काणकोणकर मारहाण प्रकरणाच्या मुळाशी जाणार; मुख्यमंत्री सावंतांचे आश्वासन

Viral Video: भिंतीपलीकडं डोकावून पाहत असताना 'भिंतच' कोसळली, काकाला डोळ्यासमोर दिसला मृत्यू; थरारक व्हिडिओ व्हायरल

"कोणाचीही गय करणार नाही", रामा काणकोणकर मारहाण प्रकरणाच्या मुळाशी जाणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

बैलांच्या झुंजीत चांदर येथील 42 वर्षीय इसमाचा मृत्यू Video

Goa Cabinet Decision: 'युनिटी मॉल' आणि 'प्रशासन स्तंभ' होणारच; गोवा सरकार निर्णयावर ठाम

SCROLL FOR NEXT