Tilari Canal Dainik Gomantak
गोवा

अखेर तिळारी कालव्यात सोडले ‘पाणी’

अधिकाऱ्यांना आदेश, सभापती राजेश पाटणेकर यांनी घेतली दखल, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्याच्या दृष्टीने तिळारी कालव्याला महत्त्व असून, लाटंबार्से पंचायत क्षेत्राबरोबर इतर पंचायत क्षेत्रालाही या कालव्यातील पाण्याचा उपयोग होतो. परंतु गेले काही दिवस साखळीतून निघणाऱ्या तिळारी कालव्याला पाणी न सोडल्याने तिळारी कालवा कोरडा बनून राहिला होता. याबाबतचे वृत्त ‘गोमन्तक’मधून प्रसिद्ध होताच सभापती राजेश पाटणेकर यांनी याची गंभीर दखल घेत जलस्त्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांना आदेश देताच अखेर तिळारी कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. (Tilari Canal News Updates)

सभापती पाटणेकर यांनी मंगळवारी जलस्त्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांना आदेश दिल्यानंतर संध्याकाळी उशिरा कालव्यात जलपुरवठा पूर्ववत झाला. गेल्या काही दिवसांपासून कालव्यात पाणी नसल्याने कोरडा बनला होता. डिचोली (Bicholim) तालुक्यातील लाटंबार्सेच्या आसपासची शेती-बागायती करपून जाण्याच्या मार्गावर होती.

परंतु वेळीच सभापती राजेश पाटणेकर (Rajesh Patnekar) यांनी दखल घेऊन कालव्यात जलपुरवठा सुरळीत करण्यास महत्त्वाची भूमिका बजावल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या दिवसांत शेतकरी मिरची लागवड तसेच इतर भाज्यांची लागवड करतात. काही शेतकऱ्यांनी बागायती पोफळी, केळी, अननस या पिकांची लागवड केलेली आहे; परंतु पाणी नसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. पिकाची नासाडी होत असल्याने शेतकरी चिंतित होता. सभापती पाटणेकर यांच्या कानी याविषयीच्या वार्ता पडताच‌ त्यांनी जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांना कामास लावले.

शेतकऱ्यांनी (Farmer) तक्रार करताच सभापती पाटणेकरांनी देखल घेऊन अधिकाऱ्यांना सुनावले आणि संध्याकाळपर्यंत कालव्याला पाणी आले. पाणी निरंतर चालू राहावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सभापतींनी दिली भेट

तिळारी कालवा पाण्याअभावी कोरडा बनल्याने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच सभापती राजेश पाटणेकर यांनी तिळारी कालव्याच्या ठिकाणी स्वतः भेट देऊन माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी जलस्त्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्यानंतर आज संध्याकाळी उशिरा कालव्यात जलपुरवठा सुरळीत झाला.

विहिरी आटल्यानेही पाण्याची समस्या गंभीर

कालव्यात वेळेवर पाणी सोडण्यात जात नसल्याने त्याचा परिणाम शेतजमिनीवर बांधलेल्या विहिरीतील पाण्यावरही होत आहे. कालव्यात पाणीच नसल्याने विहिरीतीलही पाणी आटते. मुबलक पाण्याच्या विहिरींवरही त्याचा परिणाम होत आहे. काही शेतकरी पंप बसवून पाणी खेचून शेतीसाठी वापरत आहेत. पण, तेसुद्धा पुरेसे पाणी नसल्याने पिकांची मोठी हानी होत आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

कालव्याची दुरुस्ती, स्वच्छता व्हावी...

कालव्याची दुरुस्ती तसेच साफसफाई झाली नसल्याने येत्या काही दिवसांत त्याची स्वच्छता होण्याची शक्यता आहे. साफसफाईचे काम राष्ट्रीय ग्रामीण हमी यंत्रणेला दिलेले आहे. या यंत्रणेने सध्या कालवा सफाई करण्याबाबत दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे. साफसफाई अथवा दुरुस्ती न झाल्याने त्या ठिकाणी झाडे झुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे कालव्याची दुरुस्ती व स्वच्छता व्हावी, अशी लाटंबार्सेतील शेतकऱ्यांची मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT