Mla Pravin Arlekar Gomantak Digital Team
गोवा

Water Issue : पेडणेतील पाणी समस्या तातडीने सोडवा

आमदार आर्लेकरांकडून अधिकारी धारेवर : चांदेल येथील पाणी प्रकल्पाला दिली भेट

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News : पेडणे मतदारसंघात भेडसावणारी पाण्याची समस्या लक्षात घेऊन शुक्रवारी आमदार प्रवीण आर्लेकर यांनी चांदेल येथील प्राणी प्रकल्पाला भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

पेडणेतील जनतेला कुठल्याही प्रकारे पाण्याची समस्या होऊ नये, त्यासाठी तात्काळ उपाययोजना करा. पाणी मर्यादित असेल तर तसे पूर्वसूचित करा, अतिरिक्त टँकरची सोय करून पाणी पुरवठा करा, अशा सूचना आर्लेकर यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

यावेळी पेडणे पाणी विभागाचे अभियंते सोमा नाईक, सहाय्यक अभियंते संदीप मोजरकर, चांदेल पाणी प्रकल्पाचे अधिकारी बालाजी फडते, चांदेल हसापूर पंचायतीचे सरपंच तथा पेडणे भाजप मंडळाचे अध्यक्ष तुळशीदास गावस, कासारवर्णेचे सरपंच नवनाथ नाईक, पंच बाळा शेटकर, आनंद गावस, प्रकाश गावस, रतन गावस, सुधीर मळीक, तसेच नागरिक उपस्थित होते.

मार्चमध्येच एवढी समस्या असेल तर एप्रिल, मेमध्ये कशी उपाययोजना करणार, असाही प्रश्न आमदार आर्लेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारला. आपण यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी संबंधित खात्याचे मंत्री नीलेश काब्राल तसेच मुख्यमंत्री डाॕ. प्रमोद सावंत यांना भेटणार आहे, असेही आर्लेकर म्हणाले.

कंत्राटी कामगारांचा वेतनप्रश्‍न सोडवा !

पाणी विभागातील कंत्राटी कामगार यांच्या वेतनाचाही प्रश्न यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना विचारून त्यांचे वेतन कमी असल्याने त्यांना वाढवून देण्याबाबतही कोणत्या उपाययोजना केल्या, अशी विचारणाही आमदार प्रवीण आर्लेकर यांनी केली. गेली अनेक वर्षे हे कर्मचारी कंत्राटी तत्वावर काम करत असून सरकारने त्यांच्या वेतनाचा प्रश्न सोडवावा, अशी सूचना यावेळी आर्लेकर यांनी केली.

वीज नसते मग नियोजन का करत नाही ?

पेडणेत वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. याचा पाणीपुरवठ्यावरही परिणाम होतो, हे माहीत आहे, तर त्यासंबंधी वेगळे नियोजन का केले नाही, असा सवाल आमदार प्रवीण आर्लेकर यांनी केला. पंप कार्यान्वित होण्यासाठी उपाययोजना का केल्या नाहीत. नियोजन आराखडा तयार करून याबाबत उपाययोजना करावी, असे निर्देशही यावेळी आमदार आर्लेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ट्रॅक्टरला रथासारखी चाकं... सोशल मीडियावर व्हायरल झाला भन्नाट 'जुगाड', लोक म्हणाले, "हा आहे नवा भारत"

Shubman Gill Era Begins! पहिल्याच वनडेत 'कॅप्टन कूल' धोनीचा विक्रम मोडला, केली 'ही' मोठी कामगिरी

Renuka Yellamma History: वीरशैव संप्रदायात धार्मिक उठाव झाला, सावदत्ती वैष्णव राजांच्या अधिपत्याखाली आली; यल्लम्माशी निगडित प्रथा

Betoda: बेतोड्यात आयआयटीला विरोध, सरपंचांना धरले धारेवर; ग्रामसभेत ठराव मंजूर

IND VS AUS: रोहित, विराट की आणखी कोणी? कॅप्टन शुभमन गिलनं सांगितलं पराभवाचं खरं कारण, म्हणाला...

SCROLL FOR NEXT