Anjua Water Crisis: Locals took Ghagar Morcha to PWD Office Dainik Gomantak
गोवा

कुणी पाणी देता का पाणी? हणजूण-कायसूव स्थानिक आक्रमक, PWD कार्यालयावर घागर मोर्चा

Anjuna Water Crisis: बादे येथे नवीन पाणी ट्रिटमेंट प्रकल्पाचे काम सुरू असून डिसेंबरअखेर ते पूर्ण होईल; साहाय्यक अभियंता रणधीर अष्टेकर.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: हणजूण-कायसूव गावातील पाणीपुरवठा मागील काही महिन्यांपासून विस्कळीत झाल्याने आज (ता.१७ सप्टेंबर) पंचायत मंडळाच्या नेतृत्वाखाली दत्तवाडी-म्हापसा येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा कार्यालयावर स्थानिकांनी घागर मोर्चा काढला.

पाणी प्रश्न सोडविण्यासाठी स्थानिकांनी अधिकाऱ्यांना १५ दिवसांची मुदत दिली असून, पाणीपुरवठा पूर्ववत करेपर्यंत विभागाने संबंधित ग्राहकांच्या गरजेनुसार टँकरने पाणीपुरवठा करावा, असे लेखी आश्वासन आंदोलनकर्त्यांनी साहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंत्यांकडून लिहून घेतले.

मात्र, दिलेल्या वेळेत पाणीपुरवठा पूर्ववत न केल्यास स्थानिक रस्त्यावर उतरतील आणि हणजूण गाव बंद आंदोलन छेडण्यात येईल, असा सज्जड इशारा मोर्चेकऱ्यांनी यावेळी दिला.

याला उत्तर देताना साहाय्यक अभियंता रणधीर अष्टेकर यांनी मोर्चेकरांना म्हणाले की, बादे येथे नवीन पाणी ट्रिटमेंट प्रकल्पाचे काम सुरू असून डिसेंबरअखेर ते पूर्ण होईल. त्यानंतर पाणीपुरवठ्यात सुधारणा होईल. यावेळी स्थानिक कनिष्ठ अभियंता तनय कांदोळकर यांच्यावर देखील स्थानिकांनी प्रश्नांची सरबत्ती केली.

'साबांखा'कडे कर्मचाऱ्यांचा अभाव

स्थानिक रोहन रमेश नाईक म्हणाले की, ही समस्या भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याच्या कामामुळे उदभवली आहे. सध्या पाणी पुरवठा कार्यालयात कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. याचा परिणाम स्थानिकांना भोगावा लागत आहे. तसेच वारंवार जलवाहिन्या फोडल्या जातात; परंतु त्यांची दुरुस्ती होत नाही.

मध्यंतरी याच वाहिन्या दुरुस्त करतेवेळी वाहिन्यांतून मृत उंदीर, चप्पल, प्लास्टिक व इतर पालापाचोळा आढळला होता. यातून साबांखा विभागाचा भोंगळ कारभार दिसून येतो, अशी टीका त्यांनी केली.

जलवाहिनीत मृत उंदीर, प्लास्टिक, चप्पल

गेल्या काही दिवसांपासून हणजूण-कायसूव गावातील अनियमित पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थ त्रस्त आहेत. या स्थानिकांनी आरोप केला की, सध्या गावात भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याच्या कामाच्या खोदकामावेळी जलवाहिन्या फुटल्या होत्या.

या जलवाहिन्या ४० वर्षांपूर्वीच्या असून त्यात मृत उंदीर, प्लास्टिक, पालापाचोळा, चप्पल व इतर कचरा मोठ्या प्रमाणात आढळला होता. यामुळेच जलवाहिन्या चोकअप झाल्याचे सांगत आंदोलनकर्त्यांनी अभियंत्यांना जाब विचारला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

SCROLL FOR NEXT