खाण खंदक  Dainik Gomantak
गोवा

Bicholim : धबधबा खाण खंदकातील पाणीउपसा सुरू

नागरिक निश्‍चिंत : परिसरातील नदीत सोडले जात आहे पाणी

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली : लामगाव येथील खाण खंदक असुरक्षित बनले असतानाच, शहराला टेकून असलेल्या धबधबा येथील खाण खंदकातून मात्र पाणीउपसा सुरू करण्यात आला आहे. पूर्वीप्रमाणेच या खाण खंदकातील पाणी तेथीलच नदीत सोडण्यात येत आहे. धबधबा येथील खाण खंदकातून पाणी उपसा सुरू असल्याने परिसरातील नागरिक सध्या तरी निश्‍चिंत आहेत.

लामगाव येथील खंदकापासून जवळपास दोन किलोमीटर अंतरावर गावकरवाड्यापासून जवळच धबधबा परिसरात असलेले खाण खंदक डिचोलीतील एक मोठे खंदक आहे. गेल्या जवळपास दहा वर्षांपासून ऊन-पावसात मिळून नियमितपणे या खंदकातील पाणी बाहेर म्हणजेच धबधबा परिसरातील नदीत सोडण्यात येत आहे.

त्यासाठी सारमानस रस्त्याच्या खालून मोठे पाईपही घालण्यात आले आहेत. मात्र, गेल्यावर्षी खाणी सरकारच्या ताब्यात आल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून या खाण खंदकातील पाणी बाहेर सोडणे बंद होते. खाण खंदकातील पाणी बाहेर सोडणे कधीपासून बंद झाले, त्याची माहिती मिळाली नाही.

लामगाव खंदकावर उपाययोजना

लामगाव येथील खाण खंदकावर सुरक्षेच्यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्याच्या दृष्टीने कंपनी व्यवस्थापनाने हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या आठवड्यात हे काम मार्गी लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. खाण खंदकाच्या मातीचा भराव खचला असून, काही ठिकाणी मातीही कोसळलेली आहे. हे खाणखंदक असुरक्षित असले, तरी खंदकातील पाणी उपशाचे काम सुरू करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cabinet Expansion: रमेश तवडकर आणि दिगंबर कामत 'शपथबद्ध'! वर्षभर रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर पूर्ण

Mumbai Cricket: मुंबई क्रिकेटमध्ये खळबळ! कर्णधारपदाचा राजीनामा दिला, खेळाडूने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना दिला धक्का

Digambar Kamat: सातवेळा मडगावातून विजयी, 2007 ते 2012 काळात मुख्यमंत्रिपदी; दिगंबर कामत यांची चढ-उताराची वाटचाल

Mandovi River Cruise Sink: किनाऱ्यावर नांगरलेल्या बोटीत शिरलं पाणी, मांडवी नदीत 'क्रूझ' बुडाली; राज्यात पावसाचं थैमान

Ramesh Tawadkar: रमेश तवडकर यांची 'श्रम-धाम फळाला, क्रीडा शिक्षक ते सभापतीपदापर्यंत यशस्वी वाटचाल, वाचा त्यांची कारकीर्द

SCROLL FOR NEXT