Margao Road  Dainik Gomantak
गोवा

Margao Road : कोंब-मडगाव परिसरात सांडपाणी वाहते रस्त्यावर

Margao Road : विठ्ठल मंदिराजवळ असलेल्या चेंबरमधून असेच पाणी गेल्यावर्षीही वाहत होते व त्यानंतर सिवरेज व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी वरचेवर दुरुस्ती केली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी, मडगाव येथील कोंब भागात कित्येक ठिकाणी सिवरेज चेंबरची झाकणे उघडल्याने त्यातून सिवरेजचे पाणी रस्त्यावरून वाहू लागले आहे.

विठ्ठल मंदिराजवळ असलेल्या चेंबरमधून असेच पाणी गेल्यावर्षीही वाहत होते व त्यानंतर सिवरेज व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी वरचेवर दुरुस्ती केली होती. यंदाही तीच परिस्थिती गेले १५ दिवस उद्भवली आहे. शिवाय काही खासगी निवासी सोसायटीतील सिवरेज चेंबर उघडे पडून त्यातूनही पाणी वाहू लागले आहे.

लोकांना त्यातून वाट काढत जावे लागत आहे. आज सकाळी मडगावचे आमदार दिगंबर कामत व स्थानिक नगरसेवक सगुण नायक यांनी पाहणी केली.

यासंदर्भात बोलताना कामत म्हणाले की, आपण हा प्रश्र्न विधानसभेत उपस्थित केला असून शिरवडे येथील सिवरेज प्लांटची क्षमता वाढविण्याची मागणी सरकारकडे केली आहे. शिरवडे येथील सिवरेज प्लांट पूर्णपणे भरल्याने मडगावमधील सिवरेज पाईपलाईनवर त्याचा परिणाम झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: शुक्रवारचा दिवस ठरणार लाभदायक! 4 राशींना मिळणार यशाची नवी दिशा; कुटुंब, करिअर आणि आर्थिक क्षेत्रात सकारात्मक बदलांचे संकेत

Goa Drugs Case: काणकोणमध्ये अंमली पदार्थांवर कारवाई; 26.9 ग्रॅम चरससह हॉटेलच्या वेटरला अटक

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

SCROLL FOR NEXT