waste project in goa Dainik Gomantak
गोवा

कुडचडे-काकोडा कचरा प्रकल्प आजपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू

सुमारे 100 टन क्षमता असलेल्या या प्रकल्पामुळे दक्षिण गोव्यातील चार तालुक्यांची कचरा समस्या सुटणार

दैनिक गोमन्तक

केपे: कुडचडे-काकोडा पालिकेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाची चाचणी 10 मेपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार आहे. सुमारे 100 टन क्षमता असलेल्या या प्रकल्पामुळे दक्षिण गोव्यातील चार तालुक्यांची कचरा समस्या सुटणार आहे.

या प्रकल्पात सुक्या व ओल्या कचऱ्यावर वेगवेगळी हाताळणी होणार आहे. दोन्ही ठिकाणी मिळून 100 टन कचऱ्याची रोज आवश्यकता भासणार असून, उद्या सकाळी प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्पाची चाचणी होणार आहे.

30 मे रोजी या प्रकल्पाचे उद्‌घाटन करण्याची सरकारची योजना आहे. मात्र अद्याप काम पूर्ण झालेले नाही. तसेच प्रकल्पाच्या चाचणीनंतर तारीख ठरवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रकल्पाची उद्‌घाटनाची तारीख सध्या जाहीर झाल्याने प्रकल्पाचे उर्वरित काम युद्धपातळीवर सुरू आहे.

या प्रकल्पासाठी लागणारा 100 टन कचरा केपे, काणकोण, सांगे व धारबांदोडा तालुक्यातून पुरणार नसल्याने मुरगाव व मडगाव पालिकेचाही कचरा याठिकाणी आणावा लागणार आहे. अन्यथा हा प्रकल्प यशस्वी ठरणार नसल्याचे बोलले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT