Garbage Dainik Gomantak
गोवा

मडगावात कचरा प्रकल्पासाठी मंगळुरूमधील कंपनीचा प्रस्ताव

कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे सध्याच्या शेडमध्ये बायोडायजेस्टर बसवून तेथे रोजच्या कचऱ्यावर प्रक्रिया करता येईल.

दैनिक गोमन्तक

मडगाव: शहरातील रोजच्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून वीजनिर्मिती करणाऱ्या एका प्रकल्पाचा प्रस्ताव मंगळुरूमधील एका कंपनीने नगरपालिकेला दिला असून त्याचे सादरीकरणही केले आहे.

इन्सिनरेशन व बायोडायजेस्टरव्दारे ही प्रक्रिया होणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण 16 कोटी खर्च येईल आणि तो पीपीपी तत्त्वावर चालवण्यात येईल. त्यासाठी संबंधित कंपनी खर्चाच्या 60 टक्के गुंतवणूक करेल, तर उर्वरित खर्च नगरपालिकेला करावा लागणार आहे. या कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे सध्याच्या शेडमध्ये बायोडायजेस्टर बसवून तेथे रोजच्या कचऱ्यावर प्रक्रिया करता येईल, तर इन्सिनरेटरसाठी बाहेर वेगळे शेड उभारावे लागेल. तेथे सुका कचरा हाताळता येईल.

दोन्ही प्रक्रियांमधून जे इंधन तयार होईल, त्याचे रूपांतर विजेत करता येणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. या प्रकल्पासाठी केंद्राकडून 30 टक्के सबसिडी मिळणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. या प्रस्तावावर सध्या चर्चा झाली असून नगरपालिकेची बैठक बोलावून त्यावेळी त्याला मंजुरी दिली जाणार आहे.

कचरा संकलनासाठी नव्याने निविदा

पालिका कक्षेतील दारोदार कचरा (Garbage) गोळा करण्यासाठी नव्याने निविदा मागविल्या जाणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याबाबतचे सारे सोपस्कार पूर्ण केले गेले असून निवडणूक आचारसंहिता उठविताच निविदा मागविल्या जातील. नव्या आर्थिक वर्षासाठी म्हणजे 1 एप्रिलपासून हा ठेका राहील. सध्या हे काम ग्रीन ग्लोब सेल्फ हेल्प हा ठेकेदार फातोर्डात, तर बापू एन्वायरमेंट हा मडगावातील (Margao) कचरा गोळा करतो. त्यावर पालिका महिन्याकाठी 30 लाख रुपये खर्च करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT