Protest for Road Dainik Gomantak
गोवा

खराब रस्त्यांविरोधात नागरिकांची अनोखी निदर्शने! खड्ड्यांमध्ये कागदी होड्या आणि खोट्या नोटा सोडत घोषणाबाजी

Bad Roads In Goa: अनेक वेळा रस्ता दुरूस्तीचे आश्‍वासन देऊनही खड्डे दुरुस्त झालेले नाहीत, खड्ड्यांचा आकार दिवसेंदिवस वाढत आहे

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा : शहरातील सर्वच रस्त्यांची चाळण झाली असून वाहनेही चालविणे कठीण होत आहे. या खड्ड्यांतून पाणी भरल्यामुळे खड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे दररोज अपघात घडत आहेत. यंदाच्या पावसाळ्यात या खड्ड्यांना तलावाचे रूप प्राप्त झाले असून चिखलमय पाण्यातून ये-जा करावी लागत आहे. या समस्येने त्रस्त बनल्याने समविचारी प्रमुख समाज कार्यकर्त्यांनी एकत्र येत, खोर्ली-सीम परिसरात निदर्शने करण्यात आली. यावेळी खड्ड्यांतून कागदी बोटी अन् नोटा फिरवण्यात आल्या.

येत्या दोन दिवसांत रस्ते पूर्ववत न केल्यास पालिका कार्यालयात जाऊन जाब विचारण्यात येणार असून साबांखा कार्यालयात डांबर, खड्डी भेट देण्याचा इशारा या संतप्त आंदोलनकर्त्यांनी दिला. आंदोलनकर्त्यांनी पाणी साचलेल्या खड्ड्यात कागदी होड्या, कमळ चिन्ह असलेले कागद, खोट्या नोटा सोडून तसेच खडी, सिंमेट ब्लॉक, क्रिकेट पॅड्स सोबत घेऊन तसेच डोक्यावर हेल्मेट परिधान करून सरकारसह स्थानिक म्हापसा पालिकेच्या विरोधात घोषणाबाजी देत निदर्शने केली. यावेळी विजय भिके, जितेश कामत, चंदन मांद्रेकर, नगरसेवक अ‍ॅड. शंशाक नार्वेकर, सीतेश मोरे व इतर उपस्थित होते.

विजय भिके म्हणाले, सरकार व स्थानिक पालिका सध्या निद्रिस्त आहे. परिणामी सामान्य नागरिकांना पावसाळ्यात या खड्ड्यांच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या खड्ड्यांमुळे अनेकजण जखमी होतात, वाहनांची हानी होते, तसेच दररोज मानसिक मनस्ताप सहन करावा लागतो. परंतु सरकारला जाग येत नाही. या संवेदन शून्य सरकारला जाग यावी, यासाठीच ही निदर्शने करण्यात आली. येत्या सोमवारपर्यंत या रस्त्यांची डागडुजी झाली नसल्यास येत्या पालिकेवर मोर्चा काढण्यात येईल, असे निदर्शकांनी यावेळी स्पष्ट केले.

अ‍ॅड. शंशाक नार्वेकर, चंदन मांद्रेकर यांनीही मनोगत व्यक्त करीत, सरकारच्या भोंगळ कारभारावर सडकून टीका केली.

फक्त जाहिरातबाजी, वस्तुस्थिती वेगळी!

जितेश कामत म्हणाले, म्हापसा शहरासह राज्यातील रस्त्यांची दैना झाली आहे. या खड्ड्यांमुळे शहरात एकाला जीव गमावावा लागला होता. अनेक वेळा रस्ता दुरूस्तीचे आश्‍वासन देऊनही खड्डे पूर्ववत झालेले नाहीत, मात्र खड्ड्यांचा आकार दिवसेंदिवस वाढत आहे. आमदार हे डागडुजीच्या कामांचा सोशल मीडियावर गाजावाजा करतात. परंतु वस्तुस्थिती वेगळी असून आमदार जाहिरातबाजी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant Record: ऋषभ पंतने 'कॅप्टन कूल'चा रेकॉर्ड मोडला! आता क्रिकेटच्या देवाचा नंबर! करणार 'ही' मोठी कामगिरी

WWE सुपरस्टारची गोळ्या घालून निर्घृण हत्या, 18 वर्षांची कारकीर्द एका क्षणात संपली

Wild Vegetables: पावसाळ्यातील किमया! गोव्यातील चविष्ट रानभाज्या..

'कोणतरी मरत नाही तोपर्यंत सरकार लक्ष देणार नाही'; मनसे नेत्याने शेअर केला कशेडी बोगद्याचा धक्कादायक व्हिडिओ

Shravan 2025: 'श्रावण सोमवार' व्रत करणार असाल तर 'हे' नक्की वाचा! काय करावं, काय टाळावं? पूजेचे संपूर्ण नियम

SCROLL FOR NEXT