खांडोळा: रायबंदर परिसरात मलनिस्सारण वाहिनीचे काम मार्च, एप्रिल, मे महिन्यात करण्यात आले. त्यावेळी रस्ताही मोठ्या प्रमाणात खोदण्यात आला. पण रस्ता पूर्ववत केला नसल्याने जून महिन्यातील पहिल्या पावसातच संपूर्ण रस्ता उखडला असून अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथील खड्ड्यातून रस्ता शोधत वाहने चालवावी लागतात. हा रस्ता त्वरित दुरूस्त करावा, अशी वाहन चालकांची मागणी आहे.
पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतल्याने या मार्गावर त्वरित जेट पॅचर मशीनद्वारे येथील खड्डे बुझवायला हवेत, असे मत वाहनचालकांसह रायंबदरवासीयांची आहे. कारण भरपावसात येथील खड्ड्यात सिमेंट-क्राँक्रिट घातले होते, ते वाहून गेले. आत्ता पाऊस कमी असल्याने रस्त्याचे काम करणे सोयीचे आहे, तेव्हा संबंधितांनी या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी स्थानिकांची मागणी आहे.
इमेजन पणजी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत आयपीएससीडीएलने मलनिस्सारण वाहिनीच्या कामासाठी रायबंदर रस्ता बंद केला होता. १० मार्च ते ३१ एप्रिलपर्यंत काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. पण हे काम मे महिन्यापर्यत करण्यात आले, तरीही रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळेच पहिल्या पावसात रस्ता खराब झाला. त्यानंतर भरपावसात दुरूस्ती सुरू झाली. त्याचा काहीही उपयोग झाला नाही आिण संपूर्ण रस्ताच खड्डेमय झाला.
रायबंदरच्या खराब रस्त्यामुळे कदंबा पठारमार्गे पणजीला ये-जा करीत आहेत. पण चिंबल आणि मेरशी तिठ्यावर प्रचंड मोठ्या रांगा लागत आहेत. दररोज वाहतूक कोंडी होत आहे. चिंबल, मेरशी तिठ्यावर लांबच्या लांब रांगा लागत आहेत. सकाळ-संध्याकाळ प्रचंड वाहतूक कोंड होत आहे. या प्रकारामुळे कोणालाही वेळेत कार्यालय, शाळा, महाविद्यालयात पोचता येत नाही आणि संध्याकाळी किमान तासभर उशिरा घरी पोचावे लागत आहेत. पुलांचे कामही मंदगतीने सुरू आहे. हा पूल कधी पूर्ण होणार या प्रतीक्षेत वाहनचालक आहेत.
शिवोलीतील ग्रामीण विकास संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथील बुर्ये जंक्शन परिसरातील रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलन केले. या आंदोलनास शिवोली नागरिक समितीचे अमृत आगरवाडेकर, सामाजिक कार्यकर्ते ग्रेगरी फर्नांडिस, फातीमा फर्नांडिस, व्हिक्टर फर्नांडिस, ज्योकीम बार्रुस आदी कार्यकर्ते उपस्थित होते. शिवोलीतील रस्त्याची सध्या चाळण झालेली असून चतुर्थीपूर्वी ही परिस्थिती बदलावी अन्यथा स्थानिकांना उग्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा शिवोली नागरिक समितीचे अध्यक्ष आगरवाडेकर व व्हिडीसी समितीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.