Goa Taxi Driver Assaulted  Dainik Gomantak
गोवा

Mopa Taxi Counter : ‘मोपा’वर टॅक्सी काऊंटर सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा

दोन संघटना एकत्र : सरकारने दहा दिवसांच्या आत अंमलबजावणी करावी

दैनिक गोमन्तक डिजिटल

मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपावर सरकारने दहा दिवसांच्या आत स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांसाठी टॅक्सी काऊंटर सुरू करावा. अन्यथा गाड्या मोपा रस्त्यावर आणून आम्ही प्रखर आंदोलन सुरू करू व त्याची सगळी जबाबदारी ही सरकारवर असेल, असा इशारा नागझर येथे नाना शेट सभागृहात आयोजित केलेल्या सभेत सरकारला देण्यात आला.

राजन कोरगावकर म्हणाले की, पेडणेचे आमदार बाजू मांडण्यास व आवाज उठवण्यास कमी पडत असून सरकार या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहात नाही.

विमानतळावर रोजगाराबाबतीत जमीन गेलेल्यांना व स्थानिकांना प्राधान्य हे मिळायलाच पाहिजे. यावेळी उदय महाले व रूपेश कुंब्रलकर हे आंदोलकांचे दोन गट एकत्र आले. दोन्ही गटांतील इच्छुक टॅक्सीधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भरत बागकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

यापूर्वी आम्ही मोपाचा भाग बॉक्साइट खाण उद्योगात जाण्यापासून इशारे देऊन वाचविला. शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाची साधने नष्ट करून मोपा विमानतळ प्रकल्पात रोजगारीबाबत त्यांना डावलले आहे आणि आता टॅक्सी गाड्यांबाबतही लोकांना रस्त्यावर यावे लागते, हे योग्य नव्हे. मी लोकांसोबत आहे.

- ॲड. रमाकांत खलप, माजी केंद्रीय मंत्री

जिथे विमानतळ होते तिथे स्थानिकांसाठी टॅक्सी स्थानक असते. पण सरकार स्थानिकांना सात्यत्याने डावलण्याचा प्रयत्न करीत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी माझी बोलणी झाली आहेत व ते हा प्रश्न सोडवतील, अशी आशा आहे.

- सुदीप ताम्हणकर, बसमालक संघटनेचे नेते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Assonora Accident: दारूच्या नशेत चालवली गाडी, थेट कोसळली कालव्यात; मित्राचा बुडून मृत्यू, संशयिताचा जामीन नाकारला

Goa ZP Election: 2 मतदान केंद्रे रद्द, नवीन केंद्राला मान्यता; दक्षिण गोव्यात जि.पं. निवडणूक वारे जोरात

Sattari Scrapyards: भंगारअड्ड्यांवर पडला छापा, गोव्यात सापडला बांगलादेशी घुसखोर; सत्तरीतील बेकायदेशीर अड्डयांमुळे 3 वर्षांपूर्वीची घटना चर्चेत

Goa Spiritual Festival 2026: गोव्यात रंगणार 'स्पिरिच्युअल फेस्टिव्हल', लंडन येथे घोषणा; देवस्थानांची दर्शनयात्रा, तारखा जाणून घ्या..

Goa Beach: "भज मन राधे गोविंदा!" हरमल बीचवर चक्क विदेशी पर्यटकांनी गायले 'भजन'; गोव्याच्या किनाऱ्यावरील व्हिडिओ तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT