Wall Collapses At Fatorda Dainik Gomantak
गोवा

Wall Collapses At Fatorda: झोपेतच युवकावर काळाचा घाला; छप्पर आणि भिंत कोसळली

Fatorda: छपराचा पत्रा लागल्‍याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने गंभीर अवस्थेत युवकाचा मृत्यू

गोमन्तक डिजिटल टीम

ताळसांझर-फातोर्डा येथे सकाळी साडेसहा वाजता घराचे छप्पर आणि भिंत कोसळून कार्तिक चौहान (वय १८ वर्षे) या युवकाचा झोपेत असतानाच मृत्यू झाला, तर त्याचे वडील दिग्विजय चौहान (वय ४६ वर्षे) जखमी झाले. त्‍यांच्‍यावर इस्‍पितळात उपचार सुरू आहेत. मडगावातील पडझडीची ही पाचवी घटना आहे.

हे घर पिएदाद फर्नांडिस यांचे आहे. ज्‍या घरात दुर्घटना घडली, तिथे हे दोघे भाड्याने राहात होते. घराच्या मागील खोलीत दिग्विजय चौहान आणि कार्तिक हे दोघे रात्री झोपले होते. सकाळी साडेसहा वाजता घराची मागील भिंत कोसळली. त्याचवेळी घराचे छप्परही खाली आले. कार्तिकच्या अंगावर छप्पर पडल्याने तो गंभीर जखमी झाला. छपराचा पत्रा लागल्‍याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने गंभीर अवस्थेत कार्तिकचा मृत्यू झाला. दिग्विजय यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

कार्तिकचा मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवला आहे, तर दिग्विजय यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच या प्रभागाच्या नगरसेविका निमिषा फालेरो यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. पालिकेच्या कामगारांनाही घटनास्थळी बोलावले होते; पण घराचे छप्पर काढण्याचा प्रयत्न केल्यास पूर्ण घरच कोसळण्याची शक्यता असल्‍याने मदतकार्यासाठी आपत्कालीन सेवा पथकाला बाेलाविण्‍यात आले.

सरकारी मदतीतून घराची दुरुस्ती

नगरसेवक निमिषा फालेरो य‍ांनी राज्य सरकारने आपदग्रस्त कुटुंबीयांना मदत करावी, तसेच कोमुनिदादच्या जागेतील घरांच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. या घराची दक्षिण गोवा आपत्कालीन सेवा पथकाने पाहणी केली असून तलाठ्यानेही नुकसानीचा आढावा घेतला आहे. सरकारी मदतीतून या घराची दुरुस्‍ती करण्‍याचे काम लवकरच हाती घेतले जाईल, अशी माहिती आमदार विजय सरदेसाई यांनी दिली.

पावसाच्या पाण्याने भिंत फुगली

ताळसांझर येथील कोमुनिदादच्या जागेत डोंगराच्‍या पायथ्‍याशी हे घर असून गेले काही दिवस संततधार पावसामुळे त्‍या घराची भिंत पाण्‍याने फुगली आणि आज सकाळी कोसळली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: पाकिस्तानी अंपायरचा तो 'अजब' निर्णय! ऑस्ट्रेलियन खेळाडूही चक्रावले, नेटकरी म्हणाले, "अशा अडाणी लोकांना अंपायर कोणी केलं?"

Video: "हटो हटो, डोन्ट डिस्टर्ब चेट्टा"! कॅप्टन सूर्याचा धमाल व्हिडीओ; नेटवर घालतोय धुमाकूळ

Goa Police Attack: दगडफेक अन् शस्त्राने वार! मध्य प्रदेशात गोवा पोलिसांवर जीवघेणा हल्ला; सब-इन्स्पेक्टर अन् हवालदार जखमी

Kurdi: 1882 साली सोमेश्वराची घटना पोर्तुगीज दप्तरात नोंद आहे! साळावली धरणाच्या जलाशयाखाली बुडालेले 'कुर्डी' गाव

Bengaluru Airport Bomb Threat: "माझ्याकडे दोन बॉम्ब आहेत", बंगळुरु विमानतळावर हायव्होल्टेज ड्रामा; इंडिगो प्रवाशाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT