Court Decision  Dainik Gomantak
गोवा

Goa: वेटरकडून हॉटेलच्या मालकीणीवर बलात्कार, तोंडावर उशी ठेऊन दिली जीवे मारण्याची धमकी; आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

Goa Court Judgement: १८ डिसेंबर २०१९ रोजी दुपारी दोनच्या सुमारास वेटरने हॉटेल मालकीणीला धमकावून महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला.

Pramod Yadav

पणजी: गोव्यातील हॉटेल मालकीणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपी वेटरला दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हडफडे, मायणा – भाटी येथील हॉटेलमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये ही घटना घडली होती. पणजीतील फास्ट ट्रॅक कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

लालरिनुंगा लालफाकझुला (रा. आयजावाल, मिझोरम) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीची नाव आहे. त्याला दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

बांद्रा, मुंबई येथील ६५ वर्षीय महिलेचा मायणा – भाटी येथे हॉटेलचा व्यवसाय आहे. या हॉटेलात लालरिनुंगा वेटर कामास होता. १८ डिसेंबर २०१९ रोजी दुपारी दोनच्या सुमारास वेटरने हॉटेल मालकीणीला धमकावून महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला. यानंतर महिलेच्या तोंडावर उशी ठेऊन जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर हणजूण पोलिसांनी ३४२, ५०६ (ii), ३७६, ३०७ अंतर्गत गुन्हा नोंद करुन तपासास सुरुवात केली. पोलिसांनी तत्काळ आरोपी लालरिनुंगाला अटक केली. पोलिसांनी सखोल तपास करुन आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल केले. न्यायालयात त्याच्यावरील आरोप सिद्ध झाले असून, त्याला दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zuarinagar: हृदयद्रावक! फ्रीजखाली गेलेला चेंडू काढताना बसला शॉक; झुआरीनगरातील चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Goa Theft: सावधान! गोव्यात चोरट्यांचा धुमाकूळ, बंद घरे होताहेत 'टार्गेट'; म्हापसा, कोलवा परिसरात दहशत

Rashi Bhavishya 1 September 2025: पैशाच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या,आत्मविश्वास उंचावेल; चांगल्या बातम्या मिळतील

Viral Video: 'तो' देवदूत बनून आला! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वासराला पाठीवर बसवून वाचवला जीव; पूरग्रस्त जम्मूतील हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल

Mental Health And Heart Disease: नैराश्य आणि ताणतणाव वाढवतात हृदयविकाराचा धोका; मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करणं ठरु शकतं जीवघेणं

SCROLL FOR NEXT