EVM Dainik Gomantak
गोवा

Goa Election 2022: मतदानयंत्रांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त

10 मार्चला दामोदर महाविद्यालयात होणार दक्षिण गोव्यातील मतमोजणी

दैनिक गोमन्तक

मडगाव: दक्षिण गोव्यातील 21 मतदारसंघांमध्‍ये झालेले मतदान, ज्या यंत्रांत सीलबंद झाले आहे, ती यंत्रे मडगावच्या दामोदर महाविद्यालयात तयार करण्‍यात आलेल्‍या स्ट्राँग रूममध्ये कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आली आहेत. येत्‍या 10 मार्च रोजी याच महाविद्यालयात दक्षिण गोव्‍यातील मतमोजणी होणार आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मतदान यंत्रांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय सुरक्षा दला, आयआरबी व गोवा पोलिस अशा तीन तुकड्या तैनात आहेत. शिवाय पूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली ठेवण्यात आला असून अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुढील जवळपास महिनाभर दिवसाचे 24 तास डोळ्‍यांत तेल घालून या तुकड्या देखरेख ठेवणार आहेत. शिवाय अग्निशमन दलाचा बंबही तैनात करण्यात आला आहे.

दरम्‍यान, काल सकाळी 6 वाजता सुरू झालेली मतदान व त्यानंतरची प्रक्रिया काही ठिकाणी आज सकाळी 5 वाजता पूर्ण झाली अशी माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT