South Goa  Dainik Gomantak
गोवा

South Goa : दक्षिण गोव्यातील मतदार दबाबापुढे झुकणार नाहीत : विरियातो फर्नांडिस

South Goa : केपे मतदारसंघातिल मतदारांनी काँग्रेस पक्षाला सदैव साथ दिली असून यावेळी सुद्धा केपेवासीय काँग्रेस पक्षासोबत राहणार असल्याचे फर्नांडिस यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

South Goa :

केपे, दबावापुढे दक्षिण गोव्यातील मतदार न झुकता काँग्रेस पक्षालाच मतदान करतील, असे काँग्रेस पक्षाचे दक्षिण गोवा उमेदवार कॅ.विरियातो फर्नांडिस यांनी केपे येथे सांगितले. फेर्नांडिस यांनी केपेचे आमदार एल्टन डीकोस्टा व काँग्रेस कार्यकर्त्यांसह आज केपे बाजरात बाजारात आपल्या प्रचाराला सुरुवात केली.

केपे मतदारसंघातिल मतदारांनी काँग्रेस पक्षाला सदैव साथ दिली असून यावेळी सुद्धा केपेवासीय काँग्रेस पक्षासोबत राहणार असल्याचे फर्नांडिस यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांपूर्वी ज्या प्रकारे लोकांनी आपल्याला साथ देऊन केपे मतदारसंघातून विजयी केले होते, तसाच प्रतिसाद पुन्हा एकदा लाभत असल्याने केपेतून चांगले मताधिक्य काँग्रेस पक्षाला मिळवून देऊ, असे एल्टन डिकॉस्टा यांनी सांगितले.

काँग्रेस पक्षाने एक चांगला उमेदवार दक्षिण गोव्यातील जनतेसाठी दिला असून लोकांनी त्याला साथ द्यावी, असेही त्यांनी सांगितले. आज केपे बाजारात फिरून काँग्रेसने आपला प्रचार केला. जरी उमेदवारी देण्यास विलंब झाला असला तरी प्रत्येक मतदाराला भेटण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे,असे डीकॉस्टा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT