South Goa Executive Dainik Gomantak
गोवा

गोव्यात मतदार भाजपवर नाराज नाही: सी. टी. रवी

भाजपला (Bjp) गोव्यात जिल्हा पंचायत (District Panchayat) आणि पालिका निवडणुकीत असे घवघवीत यश मिळालेच नसते असा दावा भाजपचे गोवा प्रभारी सी. टी. रवी (C. T. Ravi) यांनी केला.

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोव्यातील (Goa) मतदार भाजपवर (BJP) नाराज असल्याची ओरड फक्त विरोधक करतात, प्रत्यक्षात भाजपवर कुणीही नाराज नाही. मतदार नाराज असते तर भाजपला गोव्यात जिल्हा पंचायत (District Panchayat) आणि पालिका निवडणुकीत असे घवघवीत यश मिळालेच नसते असा दावा भाजपचे गोवा प्रभारी सी. टी. रवी (C. T. Ravi) यांनी केला.

आज मडगावात (Madgaon) रवी यांच्याहस्ते भाजपच्या ई बुकचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanawade) उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर (Babu Kavalekar), राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर (Vinay Tendulkar) माजी खासदार नरेन्द्र सावईकर, माजी मंत्री रमेश तवडकर (Ramesh Tawadkar) हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना रवी म्हणाले, देशात आणि गोव्यात भाजपचे सरकार चांगले काम करत आहे. गोव्यात पक्षाला स्थानिक निवडणुकात यश मिळाले आहे ते त्यासाठीच असे ते म्हणाले निवडणुकीत कुणाला उमेदवारी द्यावी ते निवडणूक जाहीर झाल्यावरच निर्णय घेतला जाईल. स्थानिक पातळीवर गट समिती संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित करणार असून त्या नावावर केंद्रीय समिती चर्चा करून योग्य तो निर्णय घेईल. प्रत्येक आमदाराची उमेदवारीही याच प्रक्रियेतून निश्चित केली जाईल असे रवी यांनी सांगितले. आज त्यांनी नंतर दक्षिण गोवा कार्यकारणी (South Goa Executive) बरोबर बैठकही घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: पाऊस थांबला, उकाडा वाढला! दमट हवामानाने नागरिक त्रस्त; तुरळक सरी कोसळण्याची शक्यता

Goa News: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त गोव्यात ‘सेवा पंधरवडा’! लोकसहभागातून राबवले जाणार उपक्रम

Sankashti Horoscope: गणपतीच्या कृपेने दूर होतील सर्व कष्ट, 'या' राशींना होणार आर्थिक फायदा; जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

Goa Crime: स्टेशनवर महिलांना लुबाडले, रेल्वेतून दारू तस्करी; पनवेलच्या संशयितावर महाराष्ट्र, कर्नाटकातही गुन्हे नोंद

Goa Fish Prices: मासळी बाजारात गर्दी! इसवण 900, बांगडे 300 रुपये किलो; जाणून घ्या ताजे दर

SCROLL FOR NEXT