Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: दोघांचा मृत्यू, तरी बसमालकाची चौकशीकडे पाठ; पाठवून दिला 50 हजारांचा चेक; पाडी अपघात प्रकरणातील घृणास्पद प्रकार

Padi Querim Accident: मयत युवकांच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा अशी मागणी करीत आदिवासी समाजातील लोक रविवारी (ता. २०) कुंकळ्ळी पोलिस ठाण्यासमोर एकवटले होते.

Sameer Panditrao

मडगाव: पाडी येथील दोन युवकाच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या त्या वोल्वो बसचा मालक चौकशीसाठी सोमवारी कुंकळ्ळी पोलिस ठाण्यात फिरकलाच नाही. उलट त्याचा प्रतिनिधी ५० हजारांचा धनादेश मयताच्या कुटुंबीयांना देण्यास पोलिस ठाण्यात आला. या एकंदर वर्तणुकीचा आदिवासी समाजाने निषेध केला आहे.

कला व सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे, माजी आमदार बाबू कवळेकर यांनीही पोलिस ठाण्यात येऊन अधिक माहिती जाणून घेतली. मागाहून पत्रकारांशी बोलताना मंत्री गावडे यांनी या लोकांना माणुसकीचा एक अंशही नाही, आपल्या हातून चूक घडली आहे याची त्यांना खंतही नाही. मयतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळालाच पाहिजे, अन्यथा आम्ही पुढील कृती करू असे सांगितले. बाबू कवळेकर यांनी एकंदर हे सर्व हास्यास्पद असल्याचे म्हटले.

मयत युवकांच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा अशी मागणी करीत आदिवासी समाजातील लोक रविवारी (ता. २०) कुंकळ्ळी पोलिस ठाण्यासमोर एकवटले होते. या अपघाताला जबाबदार ठरलेल्या त्या वोल्वो बस मालकाला पोलिस ठाण्यात बोलवावे अशी मागणी या संतप्त जमावाने केली होती. तसेच पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियस यांना निवेदनही सादर केले.

बसने ठोकर झाला होता दोघांचा मृत्यू

मागच्या बुधवारी रात्री साडेआठच्या दरम्यान, पाडी येथे वोल्वो बसने ठोकर दिल्याने दोघा युवकांचा अपघाती मृत्यू झाला होता. बस चालक राजेश शिवोळी याने अपघातानंतर बससह पळ काढला होता. नंतर पोलिसांनी कर्नाटकातील यल्लापूर येथे ताब्यात घेतले होते. मागाहून त्याला अटक करून जामिनावर सोडले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT