Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: गोव्याचा आवाज भारताचा आवाज बनेल! पत्रादेवी येथून काँग्रेस प्रचाराचा शुभारंभ

Goa Congress Launch Loksabha Campaign: गोवा आणि गोमंतकीयांच्या रक्षणासाठी मी सदैव तत्पर असेन, ॲड. रमाकांत खलप यांचे आश्वासन.

Pramod Yadav

Goa Congress Launch Loksabha Campaign

हुकूमशाही, लोकशाहीविरोधी आणि संविधानविरोधी भाजपला कायमचा धडा शिकवण्याची वेळ आली आहे. काँग्रेसने नामांकन दिलेल इंडिया आघाडीचे उमेदवार जबाबदारीने आपले कर्तव्य बजावतील. व्हॉईस ऑफ गोव्याचा व्हॉइस ऑफ इंडिया होईल, अशी गर्जना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव पत्रादेवी हुतात्मा स्मारकाजवळ केली.

इंडिया आघाडीचे उमेदवार ॲड. रमाकांत खलप आणि कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी आज गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकात लोकसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला.

काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर, हळदोणाचे आमदार कार्लोस फेरेरा, केपेंचे आमदार एल्टन डिकोस्ता, आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अमित पालेकर, वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा, गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत, टीएमसीचे जयेश शेटगावकर, शिवसेना (उद्धव ठाकरे)चे जितेश कामत, टीएमसीचे जयेश शेटगांवकर तसेच इतर विरोधी पक्षांचे पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते.

स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाने आणि परिश्रमाने गोवा मुक्त झाला. या पवित्र भूमीचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. गोव्याला फुटीरतावादी शक्तींपासून वाचवण्याची वेळ आली आहे. इंडियाच्या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा देण्याची मी सर्वांना नम्र विनंती करतो, असे उत्तर गोव्याचे उमेदवार ॲड. रमाकांत खलप यांनी यावेळी बोलताना सांगीतले.

मी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करेन आणि गोव्याच्या हक्कांसाठी लढेन असे मी जाहिर वचन देतो. गोवा आणि गोमंतकीयांच्या रक्षणासाठी मी सदैव तत्पर असेन, असे प्रतिपादन ॲड. रमाकांत खलप यांनी पूढे बोलताना केले.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील हुकूमशाही भाजप सरकारच्या पराभवाची सुरुवात झाली आहे. म्हादईबाबत भाजपने तडजोड केली आहे. त्यांनी गोव्याचे पर्यावरण नष्ट केले आहे. गोमंतकीय इंडिया उमेदवारांचा विजय निश्चित करतील, असे काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर म्हणाले.

आपचे अध्यक्ष अमित पालेकर, शिवसेनेचे जितेश कामत, गोवा फॉरवर्डचे दीपक कलंगुटकर, तृणमूल काँग्रेसचे जयेश शेटगावकर आणि इतरांनीही भाषणे केली आणि काँग्रेसने नामनिर्देशित केलेल्या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा जाहिर केला.दरम्यान, इंडियाच्या सर्व नेत्यांनी पत्रादेवीपर्यंत बसने एकत्र प्रवास केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ 1st Test: अवघ्या दोन धावांनी हुकलं शतक, शुभमन गिलच्या नावावर नकोसा रेकॉर्ड! धोनी-विराटच्या यादीत समावेश

Couple Assault Viral Video: फोटो काढणाऱ्या जोडप्याला अश्लील शेरेबाजी, बेदम मारहाण, 8 अल्पवयीन मुले ताब्यात; मुंबईतील खळबळजनक व्हिडिओ व्हायरल

Agniveer Recruitment Data Leak: मोठी खळबळ! अग्निवीरांचा डेटा डार्क वेबवर विकायचा डाव? 14 वर्षांच्या मुलाला दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात

Railways New Rules: प्रवाशांनो सावधान! ट्रेनमध्ये मोठ्या आवाजात बोलणे पडू शकते महागात; न ऐकल्यास भोगावा लागू शकतो तुरुंगवास अन् दंड

Check Dam Construction: 3 तालुक्यांत 116 बंधाऱ्यांत पाणी अडवले; परिसरातील भूजल पातळीत वाढ झाल्याचा दावा

SCROLL FOR NEXT