Viral Video Dainik Gomantak
गोवा

Viral Video: आक्षेपार्ह व्हिडिओ करुन गोव्यात परदेशी महिलांना त्रास देणारा Vlogger अडचणीत, गोवा पोलिसांकडून तपास सुरु

Goa Crime News: हा व्यक्ती बांगलादेशी असून, तो गोव्यात आलेल्या परदेशी महिलांना त्रास देत असल्याचा आरोप पोस्टमधून करण्यात आला आहे.

Pramod Yadav

पणजी: गोव्यात आलेल्या परदेशी महिला पर्यटकांचे आक्षेपार्ह व्हिडिओ करुन त्रास देणारा युट्युबर अडचणीत सापडला आहे. याप्रकरणी सोशल मिडियावरुन व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गोवा पोलिसांनी याची दखल घेत तपास सुरु केला आहे. युट्युबर गोव्यातील विविध व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट केल्यानंतर नागरिकांनी तक्रार केली आहे.

याप्रकरणी हिंदुत्व नाईट या एक्स अकाऊंटवरुन एक व्हिडिओ आणि काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. हा व्यक्ती बांगलादेशी असून, तो गोव्यात आलेल्या परदेशी महिलांना त्रास देत असल्याचा आरोप या पोस्टमधून करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी योग्य कारवाई करावी, अशी मागणी देखील या पोस्टमधून करण्यात आला आहे.

मिजान खान असे या युट्युबरचे नाव आहे. मिजान Life Story vlog या नावाने Youtube Channel चालवतो. चॅनलवरती 652 व्हिडिओ प्रसिद्ध करण्याता आले असून, चॅनलला 761 फॉलोवर्स आहेत. यामध्ये सर्वाधिक गोव्यातील व्हिडिओ आहेत. अनेक व्हिडिओत गोव्यातील बीच आणि परदेशी पर्यटक दाखवून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला आहे.

मिजान खान याने गोव्यातील विविध व्हिडिओ शेअर केले आहेत. यात अनेक व्हिडिओत त्यांने परदेशी पर्यटक महिलांशी संवाद साधला आहे. दरम्यान, त्याच्यावर परदेशी महिलांवर लैंगिक शेरेबाजी करुन त्रास दिल्याचा आरोप केला जात आहे.

मिजान खाने याने गोव्यातील असे अनेक व्हिडिओ युट्युबवर शेअर केले आहेत. दरम्यान, तक्रार समोर आल्यानंतर पोलिसांनी याची दखल घेतली असून, प्रकरणाचा तपास केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: भाड़ में जा... चाहत्याकडून हार्दिक पांड्याला शिवीगाळ, रेस्टॉरंटबाहेर नेमकं घडलं काय? पाहा व्हिडिओ

Nigeria Airstrike: "ख्रिश्चनांची कत्तल थांबवा, अन्यथा याद राखा!" ख्रिसमसच्या रात्री अमेरिकेचा नायजेरियात ISIS वर मोठा प्रहार; ट्रम्प कडाडले VIDEO

Goa Today Live Updates: क्लबसाठी अकबारी खात्याचा परवाना मिळवण्यासाठी बनावट एनओसी; तिघांविरोधात गुन्हा

CJI Surya Kant In Goa: "कोर्टात जाण्यापूर्वी 'मध्यस्थी'चा पर्याय निवडा" पणजीतील 'मध्यस्थी जागरूकता' पदयात्रेत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं आवाहन

Goa Politics: मैत्रीत 'दगा' की राजकारणाची 'मजा'? भाजपच्या बालेकिल्ल्यात मगोचा शिरकाव; युतीचे समीकरण धोक्यात!

SCROLL FOR NEXT