Ashadhi Ekadashi Sanguem Goa Dainik Gomantak
गोवा

Sanguem Rathotsav: विठ्ठल, विठ्ठल! सांगेत भाविकांचा पूर, रथोत्सवानिमित्त होणार विठूनामाचा गजर

Ashadhi Ekadashi Sanguem Goa Rathotsav: कार्तिक शुद्ध दशमीपासून सुरू होणाऱ्या कार्यक्रमात कार्तिकोत्सव, कालोत्सव व जत्रा, आषाढी व कार्तिकी एकादशीला भक्तांना गर्भकुडीत जाऊन अभिषेक करता येतो.

Sameer Panditrao

आषाढी एकादशीनिमित्त राज्यातील विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांची दाटी होणार आहे. सर्वत्र विठुनामाचा गजर होत असून विठ्ठलवाडी सांगे येथील श्री विठ्ठल रखुमाई देवस्थानातही रथोत्सवानिमित्त भाविकांचा पूर लोटणार आहे.

गोव्यात अनेक विठ्ठल मंदिरे आहेत, पण सांगे गावच्या या मंदिरात प्रवेश केल्यानंतर या भागाचा आनंद लुटताना श्री विठ्ठलाची, रुक्मिणीची व सत्यभामेची मोहक सांवळी मूर्ती पाहिल्यावर आणि चंद्रभागा नदीप्रमाणे वाहणाऱ्या नदीचे पाणी चाखताना आपण पंढरपूरची वारी केल्याचे समाधान प्रत्येक भाविकाला वाटल्याशिवाय राहणार नाही. येथे आल्यानंतर श्री विठ्ठलाचे निवासस्थान पंढरपूर नगरीची आपल्याला प्रकर्षाने आठवण होते.

मंदिरात वर्षभर अनेक उत्सव साजरे केले जातात. भक्तही मोठ्या संख्येने हजेरी लावतात. कार्तिक शुद्ध दशमीपासून सुरू होणाऱ्या कार्यक्रमात कार्तिकोत्सव, कालोत्सव व जत्रा, आषाढी व कार्तिकी एकादशीला भक्तांना गर्भकुडीत जाऊन अभिषेक करता येतो.

कीर्तन, नाटक व पोर्णिमेच्या रात्री नाैकाविहार, रथोत्सव, दशावतारी काला, गोपाळकाला व वद्य प्रतिपदेला पालखी श्रावणी सप्ताह अखंडपणे २४ तास असे प्रत्येक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. सातत्याने होणारा विठुनामाचा गजर, पालखी उत्सवात सहभागी होणारे भक्तिरसात न्हाऊन निघालेले भाविक यामुळे हा संपूर्ण परिसर भक्तिमयपूर्ण असा होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT