Goa Education Dainik Gomantak
गोवा

Goa Education: शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘व्हिजन फॉर ऑल’

नवी योजना : ‘प्रसाद नेत्रालय सुपर स्पेशालिटी’शी करार

दैनिक गोमन्तक

Goa School: गोवा सरकारने ‘व्हिजन फॉर ऑल’ योजनेखाली डोळे तपासणी, चष्मा वितरण व डोळ्यांविषयी इतर समस्या निवारणासाठी उडपी-कर्नाटक येथील प्रसाद नेत्रालय सुपर स्पेशालिटी डोळ्यांच्या हॉस्पिटलशी सामंजस्य करार केला आहे.

या सर्व सुविधा, सरकारी व निमसरकारी शाळेतील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना मोफत दिल्या जातील, अशी माहिती शिक्षण खात्याचे संचालक झिंगडे व मूल्यमापन संचालनालयाचे संचालक सक्सेना यांनी दिली. या योजनेतर्गंत २,०५,०२९ विद्यार्थ्यांची तपासणी केली जाणार आहे.

पर्वरी येथील शिक्षण संचालनालयाच्या सभागृहात शुक्रवार शैलेश झिंगडे व सक्सेना यांनी पत्रकार परिषदेत ‘व्हिजन फॉर ऑल’ योजनेची माहिती दिली.

झिंगडे म्हणाले की, या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून येत्या २८ जानेवारी २०२४ रोजी रवींद्र भवन, साखळी आणि ३० जानेवारी २०२४ रोजी राजीव गांधी कला मंदिर, फोंडा येथे सरकारी व निमसरकारी शाळांतील ९०० शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

डोळ्यांची तपासणी करुन त्यातील दोष कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयोगी ठरणार असून त्याची सुरुवात ९ सप्टेंबरपासून होणार आहे. या योजनेसाठी राज्यातील शिक्षकांना खास प्रशिक्षण देण्यात दिले आहे. ही योजना विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची ठरणार असल्याचेही झिंगडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दोन टप्प्यांत तपासणी

पहिल्या टप्प्यात १,४४८ शाळांतील २,०५,०२९ विद्यार्थ्यांची तपासणी तर दुसऱ्या टप्प्यात २९,७२५ विद्यार्थ्यांची तपासणी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये दृष्टिदोष आढळल्यास त्यांच्यावर उपचार केले जातील तसेच अशा विद्यार्थ्यांना इतर सुविधा प्रदान केल्या जातील, असेही झिंगडे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT