Vishwajit Rane
Vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा

Vishwajit Rane बेरोजगारीची समस्‍या दूर करण्‍यासाठी प्रयत्‍न करणार;विश्‍‍वजीत राणे

दैनिक गोमन्तक

वाळपई: भिरोंडा पंचायत क्षेत्रातील नागरिकांशी आपले वेगळे सबंध आहेत. त्‍यात कोणत्याही प्रकारची बाधा येऊ देणार नाही. येथील लोकांच्‍या सर्व आशा-आकांक्षा पूर्ण करण्‍याबरोबरच बेरोजगारीची समस्‍या दूर करण्‍यासाठी प्रयत्‍न करणार आहे, अशी ग्‍वाही वाळपईचे आमदार तथा आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी दिली. गावाच्‍या विकासासाठी सर्वांनी एकत्रित यावे, असे आवाहनही त्‍यांनी केले.

(Vishwajit Rane's appeal to come together for the development of the village in goa)

वांते-सत्तरी पंचायतीच्‍या प्रभाग 2 व 3 मधील उमेदवार अनुक्रमे बाबुराव दामू गावडे आणि किरण विश्वनाथ गावडे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी आयोजित कोपऱ्या बैठकीत ग्रामस्‍थांना मार्गदर्शन करताना आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजीत राणे बोलत होते. यावेळी मोठ्या संख्‍येने ग्रामस्‍थ उपस्‍थित होते. व्‍यासपीठावर बिनविरोध निवडून आलेल्या पंचसदस्य मनीषा पिळयेकर, उदयसिंग इंद्रोबा राणे यांच्‍यासह उमेदवार बाबुराव गावडे, किरण गावडे यांचीही उपस्थिती होती.

भिरोंडा पंचायत क्षेत्राच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्‍न करून येणाऱ्या काळात येथे प्रलंबित असलेली विकासकामे मार्गी लावली जाणार आहेत. सत्तरीच्या विकासासाठी आपण विविध योजना अमलात आणत असून जनतेला दिलेल्या आश्वसनांची पूर्तता करणार आहे.

आतापर्यंत विविध माध्यमांतून सत्तरीवासीयांना नोकरी, रोजगार दिलाय आणि यापुढेही देणार आहे. सत्तरीवासीयांसोबत आपण आहेच, शिवाय आमदार डॉ. दिव्या राणेही सदैव असतील. लोकांनी आपल्‍या समस्‍या आमच्‍यासमोर बिनदिक्कतपणे मांडाव्‍यात, असे मंत्री विश्‍‍वजीत राणे म्‍हणाले.

बेरोजगारी संपवणार

सत्तरी तालुक्‍याच्‍या विकासासाठी आपण अनेक योजना आखून त्‍या अंमलातही आणल्‍या, त्‍यामुळे बेरोजगारी कमी होण्‍यास खूप मदत झाली. अशाच योजना आणि उपक्रम राबवून तालुक्‍यातील बेरोजगारीची समस्‍या कायमस्‍वरूपी मिटवून टाकण्‍यासाठी आपण प्रयत्‍नशील आहे, असे राणे म्‍हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Varsha Usgaonkar: गोवा कॅबिनेट मंत्र्याची लेक ते मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री, वर्षा उसगांवकर यांचा जीवनप्रवास

John Clare Fernandes Passed Away: प्रसिद्ध तियात्रिस्त आणि साहित्यिक जॉन क्लार यांनी वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

Durand Cup 2024: माजी विजेत्या एफसी गोवा संघाला धक्का! १-१ बरोबरीमुळे आव्हान साखळी फेरीतच आटोपले

बिनदिक्कत ध्वनिमर्यादेचे उल्लंघन, पोलिसांचा कानाडोळा; असह्य दणदणाटामुळे स्थानिकांचा मोर्चा

Vijai Sardesai: गोव्याला भाजपमुक्त करण्याची गरज, फातोर्डा येथून मोहिमेची सुरुवात; विजय सरदेसाई

SCROLL FOR NEXT