Vishwajit Rane | Michael Lobo | Goa Congress News | Dainik Gomantak
गोवा

'गोव्यातील बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरुच राहणार'

गोव्यात काँग्रेस अस्तित्वात नसल्याचा विश्वजीत राणेंचा टोला; पक्षाची दारं सर्वांसाठी खुली असल्याचंही स्पष्टीकरण

आदित्य जोशी

पणजी (Panaji) : गोवा विधानसभेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. त्यातच गोव्यात सध्या राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. अधिवेशनासाठी विधानभवनात दाखल झालेल्या मंत्री विश्वजीत राणेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यापुढेही अवैध बांधकामावर टीसीपीअंतर्गत कारवाई सुरुच राहणार, असल्याचं विश्वजीत राणेंनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे विश्वजीत राणे (Vishwajit Rane) आणि मायकल लोबो (Michael Lobo) यांच्यातला वाद काही शमणार नसल्याचीच चिन्ह दिसत आहेत. (Goa Congress News Today)

विश्वजीत राणे यांनी काँग्रेसमधील अंतर्गत कलहावरही टीका केली आहे. गोव्यात काँग्रेस अस्तित्वात नाही, असा टोला राणेंनी लगावला आहे. तसंच गोव्यात काँग्रेस पक्षाच्या तोडफोडीमधेये भाजपचा कोणताही सहभाग नसल्याचं विश्वजीत राणेंनी स्पष्ट केलं आहे. भाजपमध्ये कुणीही येऊ शकतात, असं म्हणत अप्रत्यक्षपणे त्यांनी काँग्रेसमधील आमदारांना पक्षात आमंत्रण दिल्याचंच चित्र आहे. (Goa Live Updates)

आपण काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलो असून अजूनही काँग्रेससोबतच असल्याचा दावा लोबो यांनी केला आहे. मात्र काँग्रेसकडून बैठकांवर बैठका घेतल्या जात असून आपल्याला पदावरुन दूर केल्याचंही मायकल लोबोंनी स्पष्ट केलं आहे. तसंच सरकारमधील मंत्र्यांकडून आपल्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले जात असून आपल्यावर कारवाईही केली जात आहे. अशा परिस्थितीत आपण विरोधी पक्षनेतेपदी राहणं कठीण असल्याचं पक्षनेतृत्त्वाला कळवल्याचंही लोबोंनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान विरोधी पक्षनेते पदावरून मायकल लोबो यांची काँग्रेस पक्षाने हकालपट्टी केली आहे. त्यासंबंधीचे पत्र आता आपण सभापती रमेश तवडकर यांना सादर केले आहे. दुपारपर्यंत नवा विरोधी पक्षनेता निवडला जाईल आणि ती माहितीही सभापतींना सादर केली जाईल, असं स्पष्टीकरण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिलं आहे. (Goa Latest News)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT